शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 19:10 IST

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देलसीकरणाची संथगती अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवितहानी टाळण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२१पर्यंत देशात लसीकरण पूर्ण होणार, असा दावा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. मात्र लसीकरणाची सध्याची संथगती पाहता ते अवघड असून, या गतीने संपूर्ण लसीकरणासाठी आणखी दोन वर्षे तरी लागणार हे निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार डोस देण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार नागरिकांना पहिला डोस दिला आहे. एक लाख २७ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसची टक्केवारी १३.२८, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ३.८९ आहे. लसीकरणाची गती अशीच राहिल्यास जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. शहर आणि ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रांवर आजही लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत नाही.

२६ मेपर्यंत झालेले लसीकरणहेल्थलाइन वर्कर - ३९,५६४ (पहिला डोस), २१,३५२ (दुसरा डोस)फ्रंटलाइन वर्कर - ६३,००६३ (पहिला डोस), २३,५६५ (दुसरा डोस)१८ ते ४४ - १०, ८३५ (पहिला डोस)४५‌‌ ‌‌‌‌वर्षांपुढील ‌‌‌‌‌‌- १,८०, ३४७ (पहिला डोस), ४१,१८६

(दुसरा डोस)ग्रामीण भागात पहिल्या डोसची टक्केवारी - १०.३६, दुसरा डोस - २.३२शहरात पहिल्या डोसची टक्केवारी - १८.५२, दुसरा डोस-६.७०जिल्ह्यात एकूण पहिल्या डोसची टक्केवारी-१३.२८, दुसरा डोस-३.८९

१८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?१८ पेक्षा कमी वयोगटासाठी लस देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल शासनाकडून नाही. मात्र १८ ते ४४ वयोगटासाठी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू केली होती. अवघ्या दहा दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील चार खासगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातील नागरिकांना ९०० रुपये शुल्क आकारून लस देण्यात येत आहे. लस कंपन्यांनी खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून दिले आहेत.

औरंगाबाद शहरात जम्बो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी ११५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात तालुकानिहाय लसीकरण केंद्र सुरू केले. शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात लस डोस येत असल्याने शहरातील लसीकरण केंद्राची संख्या आता ६९पर्यंत खाली आली आहे. ग्रामीण भागातील लस केंद्रांची संख्या कमी झाली.

मागील एक महिन्यापासून शासनाकडून वेळोवेळी अल्प प्रमाणात का होईना लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत कोणताही खंड नाही. जास्त प्रमाणात लस डोस उपलब्ध झाल्यास पुन्हा शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविता येईल. शहरात दररोज २० हजार नागरिकांना लस डोस देता येईल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद