कोरोना चाचण्या वाढणार: दोन नवीन यंत्र मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST2021-04-13T04:02:16+5:302021-04-13T04:02:16+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात ही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, आ. हरिभाऊ बागडे, आ. ...

कोरोना चाचण्या वाढणार: दोन नवीन यंत्र मिळाले
जिल्हाधिकारी कार्यालयात ही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अतुल सावे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उप-जिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. वर्षा रोटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १९.५६...
जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर १७.८ तर पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १९.५६ आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.४१ टक्के इतका आहे. जिल्ह्यात १९२ उपचार सुविधांमध्ये वीस हजार पाचशे दहा खाटा उपलब्ध असून, कोरोना चाचण्यांचे दोन नवीन यंत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक घाटी प्रयोगशाळेस तर दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अजून एक यंत्र मिळणार असल्याने कोरोना चाचण्या वाढीव प्रमाणात करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. बैठकीत आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. बागडे यांनी विविध सूचना केल्या.
ऑक्सिजन साठ्याबद्दल सूचना...
औद्योगिक वापरातील ऑक्सिजन साठा आरोग्य क्षेत्राच्या वाढीव मागणीनुसार उपलब्ध ठेवण्याच्या सूचना उद्योगांना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट, जम्बो सिलिंडर सुविधा, ऑक्सिजन पाइपलाइनचे काम घाटी, मेल्ट्रॉन, जिल्हा रुग्णालयासह ग्रामीणमध्येही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आवश्यकतेनुसार लस साठा....
लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात चांगली अंमलबजावणी सुरू असून, आता ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आवश्यकतेनुसार लससाठा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.