कोरोना चाचणी, उपचार आणि लसीकरण एकाच ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:02 AM2021-05-17T04:02:06+5:302021-05-17T04:02:06+5:30

औरंगाबाद : एकाच छताखाली कोरोनाशी निगडीत सर्व सुविधा उपलब्ध करून देत छावणी परिषदेने एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. ...

Corona testing, treatment and vaccination in one place | कोरोना चाचणी, उपचार आणि लसीकरण एकाच ठिकाणी

कोरोना चाचणी, उपचार आणि लसीकरण एकाच ठिकाणी

googlenewsNext

औरंगाबाद : एकाच छताखाली कोरोनाशी निगडीत सर्व सुविधा उपलब्ध करून देत छावणी परिषदेने एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. कोरोनाविषयक तपासण्या (टेस्टिंग), विविध रक्त चाचण्या, कोरोनावर उपचार आणि लसीकरण हे सर्व उपक्रम छावणी परिषद रुग्णालय एकाच परिसरात देत आहे. आजपर्यंत १२ हजार ५०० हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

देशात लागलेल्या टाळेबंदीमुळे छावणी परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत. तरीही "समृध्द जनजीवन" या आपल्या उद्देशाला समोर ठेवून छावणी परिषद कोरोनाशी दोन हात करीत आहे.

दोन दिवसांपूर्वी सुरू केलेले १५ खाटांचे (बेड) कोविड सुविधा केंद्र सध्या १२ रुग्णांना उपचार देत आहे. तसेच या रुग्णालयाचे रुपांतर कोविड रुग्णालयामध्ये करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा प्रणाली (सप्लाय सिस्टीम)चे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लायन्स निदान केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या चाचण्या माफक दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.

हे सर्व सुरू असताना आपला दररोजचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) ही तितक्याच तत्परतेने सुरू ठेवला आहे. आर्थिक आणि मनुष्य बळ कमी असतानाही उपलब्ध साधनांचा वापर करून सर्व सुविधा देण्याचे आवाहन छावणी परिषद रुग्णालय पूर्ण करीत आहे.

छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता मालू, सहाय्यक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धामंदे आणि त्यांचे आरोग्य सहकर्मचारी या उपक्रमात परिश्रम घेत आहेत.

Web Title: Corona testing, treatment and vaccination in one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.