पाचोडमध्ये विनाकारण फिरणारांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST2021-05-13T04:06:07+5:302021-05-13T04:06:07+5:30

कोरोनाची दुसरी लाट सुसाट वेगाने ग्रामीण भागात पसरली असून, तिला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ग्रामीण ...

Corona test of unruly wanderers in Pachod | पाचोडमध्ये विनाकारण फिरणारांची कोरोना चाचणी

पाचोडमध्ये विनाकारण फिरणारांची कोरोना चाचणी

कोरोनाची दुसरी लाट सुसाट वेगाने ग्रामीण भागात पसरली असून, तिला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते. अनेक नागरिक विनामास्क घराबाहेर फिरताना दिसत आहेत. समजावून सांगूनही ऐकत नसल्याने शेवटी पोलीस व आरोग्य विभागाने पाचोड बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करणे सुरू केले. यामुळे झंझट नको म्हणून नागरिकांची पळापळ झाली. काही वेळातच पाचोडमधील गल्ल्याही सुनसान दिसून आल्या. ही कारवाई सपोनि. गणेश सुरवसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर व त्यांच्या आरोग्य पथकाने केली.

फोटो : विनाकारण फिरणारांवर पाचोडमध्ये कारवाई करताना पोलीस व आरोग्य विभागाचे पथक.

120521\anil mehetre_img-20210512-wa0022_1.jpg

विनाकारण फिरणारांवर पाचोडमध्ये कारवाई करताना पोलीस व आरोग्य विभागाचे पथक.

Web Title: Corona test of unruly wanderers in Pachod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.