कोरोनामुळे वृक्षारोपणाच्या फेऱ्या, जानजागृती, प्रबोधनाचे कार्यक्रम थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:04 IST2021-07-19T04:04:56+5:302021-07-19T04:04:56+5:30

औरंगाबाद : सध्या वृक्षारोपण केले जात असले तरी सामाजिक चळवळी आणि शाळा महाविद्यालय, विविध संस्था तसेच पर्यावरणप्रेमींच्या रॅली, ...

Corona stopped tree planting rounds, awareness, awareness programs | कोरोनामुळे वृक्षारोपणाच्या फेऱ्या, जानजागृती, प्रबोधनाचे कार्यक्रम थांबले

कोरोनामुळे वृक्षारोपणाच्या फेऱ्या, जानजागृती, प्रबोधनाचे कार्यक्रम थांबले

औरंगाबाद : सध्या वृक्षारोपण केले जात असले तरी सामाजिक चळवळी आणि शाळा महाविद्यालय, विविध संस्था तसेच पर्यावरणप्रेमींच्या रॅली, प्रबोधन व जनजागृतीचे कार्यक्रम बंद पडले आहेत. वन विभाग आता झाडे लावण्याचे काम आता एकटाच करतो आहे.

शासनाच्या वृक्षलागवड उपक्रमात ४८ पेक्षा अधिक यंत्रणा कार्यरत आहेत. कोरोनामुळे सुरक्षितता बाळगून वृक्षारोपण करावे, यामुळे मोठी रॅली व जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केलेले नाहीत. महाविद्यालये व शाळांतून विद्यार्थीच हजर नाहीत त्यामुळे फेऱ्या ही काढणे बंद आहे. गतवर्षी लावलेल्या घनदाट वृक्षलागवडीतील झाडांची उंची वाढलेली आहे. लॉकडाऊनमुळे वृक्षाची तोड व जनावरांपासून नासधूस होण्याचे प्रमाणही कमीच झालेले आहे.

शहराच्या अवतीभोवती घनदाट वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेेतले जात आहेत. शहरालगतच्या मोकळ्या जागा तसेच रिकाम्या प्लॉटवर मनपाच्या सहकार्याने वन विभागाने हर्सूल व कांचनवाडी परिसरात लावलेल्या झाडांची स्थितीही चांगली आहे.

कोरोनाचे नियम डावलून रॅली काढावी कशी...

दरवर्षी वृक्षलागवडीचा कार्यक्रम जोरदारपणे हाती घेतला जातो; परंतु कोरोना यंदा ते शक्य नाही. शिक्षक व कर्मचाऱ्यांकरवीच झाडे लावली जाणार आहे.

- मंजुश्री राजगुरू (मुख्याध्यापिका जि.प. शाळा सातारा)

३० हेक्टरवर केले वृक्षारोपण...

कार्यक्रमाचा देखावा करण्याची गरज नाही. विभागाला ठरवून दिलेले काम करावेच लागते. औरंगाबाद तालुक्यात ३० हेक्टरवर खड्डे करून वृक्षारोपण केलेले आहे. स्थानिक शाळा, महाविद्यालयांची मदत घेणे शक्य झाले नाही; परंतु विविध यंत्रणा त्यांच्या पद्धतीने वृक्षारोपणात सहभाग नोंदवत आहेत.- शशिकांत तांबे (वनक्षेत्र अधिकारी, औरंगाबाद )

Web Title: Corona stopped tree planting rounds, awareness, awareness programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.