कोरोनाने १३ वर्षीय मुलासह १४ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:22+5:302021-06-11T04:04:22+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील अवघ्या ३५, तर ग्रामीण भागातील १०३ ...

कोरोनाने १३ वर्षीय मुलासह १४ रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील अवघ्या ३५, तर ग्रामीण भागातील १०३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील एका १३ वर्षीय मुलासह १२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील २ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार ३७३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ११४ आणि ग्रामीण भागातील ८५, अशा १९९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना रामनगर, विहामांडवा येथील ८५ वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील ५० वर्षीय महिला, फत्तेसिंगपुरा येथील ५४ वर्षीय पुरुष, नागमठाण, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७५ वर्षीय महिला, आखतवाडा, खुलताबाद येथील ६० वर्षीय पुरुष, सिल्लेगाव, गंगापूर येथील ८० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ६६ वर्षीय पुरुष, भानुदासनगरातील ५७ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील ७३ वर्षीय पुरुष, शिवराई, वैजापूर येथील १३ वर्षीय मुलगा आणि गेवराई, बीड येथील ६६ वर्षीय पुरुष, चिलेखानवाडी, नेवासा, अहमदनगर येथील ६० वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद ४, सातारा परिसर ३, टिळकनगर १, बीड बायपास १, वाल्मी कॅम्पस, पैठण रोड १, बालाजीनगर १, वरद गणेश मंदिर २, जाधववाडी १, पैठण रोड १, ज्योती प्राईड ३, रामनगर १, घाटी १, देवळाई रोड १, हनुमाननगर १, राजीव गांधीनगर १, पैठण गेट १, संजयनगर १, अन्य १०.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १, खुलताबाद १, कसाबखेडा १, निंभोरा, ता. कन्नड १, चिरासमल तांडा १, गंगापूर १, रांजणगाव शेणपुंजी २ आणि अन्य ९५.