लिंबगावात दीडशे नागरिकांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:04 IST2021-05-24T04:04:51+5:302021-05-24T04:04:51+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण लिंबगाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीचा दिवस ...

लिंबगावात दीडशे नागरिकांची कोरोना तपासणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण लिंबगाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असूनसुद्धा पैठणचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांच्यासह दीड डझन अधिकारी, कर्मचारी व आरोग्यपथक गावात दाखल झाले. नागरिकांना सोबत घेऊन सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. दिवसभरात दीडशे नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावात जोपर्यंत कोरोना रुग्ण निघत असेल, तोपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र चालूच राहील, असे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार संतोष अनार्थे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आगाज, लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. आशा टेपाले, डॉ. गवई, सरपंच सीताबाई भिसे, उपसरपंच, कुंताबाई पवार आदींची उपस्थिती होती.