सोयगाव तालुक्याच्या सीमेवर कोरोना धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:07 IST2021-02-23T04:07:32+5:302021-02-23T04:07:32+5:30

सोयगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मजल मारली असून या जिल्ह्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यात कोरोना प्रवेश करू ...

Corona hit the border of Soygaon taluka | सोयगाव तालुक्याच्या सीमेवर कोरोना धडकला

सोयगाव तालुक्याच्या सीमेवर कोरोना धडकला

सोयगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मजल मारली असून या जिल्ह्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यात कोरोना प्रवेश करू पाहत आहे. तरी देखील सोयगाव तालुका आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे ढिसाळ झाली असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. सोयगाव तालुका हा जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील लोकांचा जळगावशी जास्त संपर्क असतो. सावळदबारा या भागातील बारा गावांचा विदर्भाशी संपर्क आहे. त्यामुळे नवीन कोरोनाच्या प्रवेशाची धास्ती जळगाव आणि बुलढाणा भागातून होत आहे. अशी भयावह परिस्थिती असताना देखील सोयगाव ग्रामीण आरोग्य यंत्रणा अद्यापही निद्रावस्थेत आहे.

चाचण्या केल्या बंद

जिल्हा परिषदेच्या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात संशयित रुग्णांच्या तपासण्या ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी ठिकाणी कोरोना चाचण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Web Title: Corona hit the border of Soygaon taluka