शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कोरोनामुळे ‘समृद्धी’चे परप्रांतीय मजूर धास्तावले; कामाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 7:02 PM

Samruddhi Mahamarg's work slowed due to corona औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे.

ठळक मुद्दे मजूर परतीच्या तयारीत आहेत एका बाजूचे काम पूर्ण करण्यावर भर

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समृद्धी महामार्गाच्या कामावर परिणाम झाला असून, पूर्वीसारखा दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन लागले, तर अडकून पडावे लागेल, या भीतीपोटी अनेक परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, कामासाठी लागणारे अनेक साहित्य बाहेरून आणण्यासाठीदेखील मोठ्या अडचणी येत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे. दरम्यान, कामासाठी आलेले परप्रांतीय मजूरही मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अचानक राज्याच्या सीमा बंद केल्या. वाहनेही बंद करण्यात आली. त्यामुळे हजारो परप्रांतीय मजूर पायी चालत त्यांच्या मूळ गावी परतले होते. यावेळीही दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन जाहीर झाले, तर इथे अडकून पडण्यापेक्षा गावी गेलेले बरे, या मानसिकतेतून अनेक जण परतण्याच्या तयारीत आहेत. महामार्गाच्या कामासाठी लागणारी यंत्रे, लोखंड किंवा अन्य साहित्य आणण्यासाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे १५ ते २० दिवसांपासून कामाची गती मंदावली आहे. मात्र, १ मेपासून शिर्डीपर्यंत या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार सध्या ६ पैकी एका बाजूच्या ३ लेनचे काम पूर्ण करण्यावर ‘एमएसआरडीसी’ने भर दिला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत दोन्ही बाजूच्या सर्व लेनचे काम पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले.

समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीला भूसंपादनाचा अडथळा‘डीएमआयसी’साठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यासाठी अखेर ‘एमएसआरडीसी’ला ४१ कोटी रुपये देण्यास ‘एमआयडीसी’ राजी झाली आहे. ‘समृद्धी’पर्यंत कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ९०० मीटर अप्रोच रस्त्याचे भूसपांदन व रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ला करावे लागणार आहे, तर ‘समृद्धी’च्या ठिकाणी ‘इंटरचेंज’चे काम ‘एमएसआरडीसी’ करणार असून, त्यासाठी ८ हेक्टर जागा लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाकरिता दिलेला पाच पट भाव ‘एमआयडीसी’कडून मिळावा म्हणून शेतकरी अडून बसले आहेत. सध्या ‘एमआयडीसी’ तडजोडीच्या भूमिकेत आहे. भूसंपादनासाठी दोन ते अडीच महिने अवधी लागण्याची शक्यता असून, जमिनीचा ताबा घेतल्यानंतर ‘इंटरचेंज’चे काम साडेतीन महिन्यांत पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद