कन्नडमध्ये कोरोनाचा स्फोट; एकाच दिवसात ९४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:04 IST2021-03-24T04:04:46+5:302021-03-24T04:04:46+5:30
कन्नड : तालुक्यात आतापर्यंतची विक्रमी कोरोना रुग्णसंख्या मागील २४ तासात वाढली आहे. एकाच दिवसात कोरोनाने ९४ जण बाधित झाले ...

कन्नडमध्ये कोरोनाचा स्फोट; एकाच दिवसात ९४ रुग्ण
कन्नड : तालुक्यात आतापर्यंतची विक्रमी कोरोना रुग्णसंख्या मागील २४ तासात वाढली आहे. एकाच दिवसात कोरोनाने ९४ जण बाधित झाले आहेत. रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहून रुग्णांना घरच्या घरी विलगीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. उपचार सुरू असलेल्या ३७१ रुग्णांपैकी २४१ जणांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे ८ हजार ४१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
बनशेंद्रा, हस्ता, रेल येथे प्रत्येकी दोन, तेलवाडी, औराळा, मेहेगाव, उपळा, कारखाना, सायगव्हाण, वाकद, घुसूरतांडा, कनकावतीनगर, ताडपिंपळगाव येथे प्रत्येकी एक, हतनूर, मक्रणपूर व पळशी खुर्द येथे प्रत्येकी तीन, चापानेर (४), बोरसर (८) व टापरगाव (१७) असे ग्रामीण भागात ५६, तर शहरात ३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोना वाढू लागल्याने न. प.च्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात येत आहे. तसेच परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.