फुलंब्री तालुक्यात कोरोनाने ओलांडली हजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST2021-04-13T04:05:11+5:302021-04-13T04:05:11+5:30
फुलंब्री तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दुसऱ्या टप्यात वेगाने वाढत आहे. मार्च २०२० पासून ३१ डिसेंबर या दहा महिन्यांच्या काळात तालुक्यात ...

फुलंब्री तालुक्यात कोरोनाने ओलांडली हजारी
फुलंब्री तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दुसऱ्या टप्यात वेगाने वाढत आहे. मार्च २०२० पासून ३१ डिसेंबर या दहा महिन्यांच्या काळात तालुक्यात ५१७ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले होते, तर दुसऱ्या लाटेत ही संख्या केवळ साडेतीन महिन्यांत दुप्पटीने वाढली आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने संक्रमिताची संख्या वाढत आहे.
पॉईंटर
१) मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत संक्रमितांची संख्या ५१७, मृत्यू संख्या- २१
२) जानेवारी २०२१ ते १२ एप्रिल २०२१ पर्यंत संक्रमितांची संख्या ५२७ व मृत्युसंख्या - १७
चौकट
हेल्मेट गाडीला, मास्क दाढीला अन् गडी बिनधास्त
शासनाकडून कोरोनाबाबत कितीही जनजागृती केली जात असली तरी, नागरिकांडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवर नागरिक हेल्मेट लटकवून तसेच मास्क दाढीला लावून बिनधास्तपणे फिरत असल्याने तसेच अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने कोरोना आजार पसरत आहे.