कोरोनामुळे मंदिरानाही आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:05 IST2021-04-11T04:05:42+5:302021-04-11T04:05:42+5:30

लासूरगाव : कोरोना महामारीमुळे शासनाने धार्मिक स्थळे बंद केली. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मंदिरांचा खर्च ...

Corona also hit the temple financially | कोरोनामुळे मंदिरानाही आर्थिक फटका

कोरोनामुळे मंदिरानाही आर्थिक फटका

लासूरगाव : कोरोना महामारीमुळे शासनाने धार्मिक स्थळे बंद केली. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मंदिरांचा खर्च कसा भागवावा याची विवंचना मंदिर विश्वस्तांना लागली आहे.

जिल्ह्याचे कुलदैवत म्हणून देवी दाक्षायणी मातेची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच राज्याबाहेरूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. आपल्या कमाईतील काही हिस्सा ते देवीच्या चरणी अर्पण करतात, परंतु कोरोना महामारीने मंदिर बंद करण्यात आले. १ मे ते १४ मे दरम्यान दाक्षायणी देवीचा वार्षिक यात्रा उत्सव असतो. ब्रेक द चेनमुळे यंदाही या उत्सवावर बंदी कायम राहणार का, जर बंदी राहिली तर मंदिरावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंदिराचे उत्पन्न वाढले नाही तर भविष्यात होणारी विकासकामे कशी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Corona also hit the temple financially