आचारसंहितेत कोनशिला उघड्याच !
By Admin | Updated: January 20, 2017 23:54 IST2017-01-20T23:53:21+5:302017-01-20T23:54:50+5:30
लातूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहरी आणि ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

आचारसंहितेत कोनशिला उघड्याच !
लातूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहरी आणि ग्रामीण भागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र अद्याप काही ठिकाणी विकास कामांच्या उद्घाटनाच्या कोनशिला उघड्याच आहेत. याकडे आदर्श आचारसंहिता राबविणाऱ्या प्रशासनाचे सध्या तरी दुर्लक्ष आहे. शुक्रवारी ‘लोकमत’च्या कॅमेऱ्याने या उघड्या कोनशिलांचे छायाचित्र टिपले आहे.
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, त्या जिल्हा परिषदेत अनेक उद्घाटनाच्या कोनशिला उघड्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात इमारत उद्घाटनाची कोनशिला आहे. तीही उघडी आहे. मानवी विकास योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनाची कोनशिलाही झाकलेली नाही. ग्रामीण भागासाठी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असताना मुख्य कार्यालयातील कोनशिला उघड्या आहेत. शिक्षक मतदारसंघाचीही निवडणूक असल्याने लातूर जिल्ह्यात आचारसंहिता आहे. त्यामुळे शहरातील कोनशिला झाकणे आवश्यक आहे. मात्र त्या झाकल्या गेल्या नसल्याचे ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशननंतर उघडकीस आले आहे.