उंडणगाव येथे मक्याच्या गंजीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:20+5:302021-01-13T04:10:20+5:30
उंडणगाव : उंडणगाव परिसरातील गोळेगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील मक्याच्या गंजीला शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागून गंजी जळून खाक ...

उंडणगाव येथे मक्याच्या गंजीला आग
उंडणगाव : उंडणगाव परिसरातील गोळेगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील मक्याच्या गंजीला शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागून गंजी जळून खाक झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे अंदाजे सत्तर हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यास मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
येथील शेतकरी विष्णू नारायण गुऱ्हाळकर यांच्या मालकीची दोन एकर शेती आहे. त्यांनी मका कणसाची गंजी त्याच शेतात लावलेली होती. या गंजीच्या जवळच विजेचा खांब आहे. मंगळवारी अचानक तारांजवळ स्पार्किंग झाल्यामुळे ठिणगी पडली. गवत जळत जाऊन गंजीपर्यंत गेले. क्षणात आगीने रौद्र रुप धारण केले. संपूर्ण मकाची गंजी खाक झाली.
आजूबाजूच्या कमलाकर लांडगे, देविदास धनवई, ईश्वर धनवई, गजानन धनवई, सुरेश धनवई, प्रमोद गुऱ्हाळकर, नामदेव गुऱ्हाळकर, सुनील गुऱ्हाळकर, प्रवीण लांडगे, शुभम लांडगे, धनवई या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढतच गेल्याने आग विझविता आली नाही. त्यामुळे या शेतकऱ्याचे किमान ४० क्विंटल मका असे ७० हजार रूपयाचे मोठे नुकसान झाले.
या घटनेचा पंचनामा तलाठी यांनी करून या शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.
सोबत मका जळालेल्या गंजीचे फोटो