'बँकेच्या सवलती शेतकर्यांपर्यंत पोहोचवा'
By Admin | Updated: November 24, 2014 12:40 IST2014-11-24T12:03:01+5:302014-11-24T12:40:02+5:30
शासनाच्या विविध बँकींग सवलती सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असे प्रतिपादन बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी केले.

'बँकेच्या सवलती शेतकर्यांपर्यंत पोहोचवा'
परभणी: शासनाच्या विविध बँकींग सवलती सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. बँक कर्मचारी हा बॅंक व शेतकरी बांधव यांच्यातील प्रमुख दुवा असून बँकेची उन्नती व शेतकरी सभासदांचे हित या दोन्हीचा विचार करत बॅकींग कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन बँकेचे प्रभारी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी केले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कर्ज वसुली व नियोजन सभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. जाधव, व्यवस्थापक आर.व्ही. मौजकर, व्ही. आर. कुरुंदकर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, दुष्काळच्या परिस्थितीने मराठवाड्यातील शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हा कर्जदार सभासद म्हणून न पाहता मानवतेच्या दृष्टीकोनातून शेतकरी बांधवांकडे बघावे, त्यांना चांगली वागणूक व सहकार्य बँकींग कर्मचार्यांनी केले पाहिजे. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कर्जवाटप करण्याबरोबर थकबाकीदार सभासद राहून एनपीएचे प्रमाण वाढणार नाही, याचे भान वसुली, तपासणीसांनी ठेवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सभेस बँकेचे अधिकारी व तपासणीस उपस्थित होते. (/प्रतिनिधी)