शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोकाळलेल्या प्री-प्रायमरी शाळांवर आता नियंत्रण येणार; नोंदणी अनिवार्य होणार

By राम शिनगारे | Updated: March 29, 2025 15:34 IST

शालेय शिक्षण विभाग तपासणीही करणार

राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: कोणत्याही गल्लीबोळात गेल्यानंतर प्री-प्रायमरी स्कूल्सनी धुमाकूळ घातलेला आहे. त्याठिकाणी अतिशय लहान बालके शिकण्यासाठी येतात. मात्र, त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा, शुल्कांचे नियमन करणारी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक हा एक टप्पा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातच शालेय शिक्षण विभागाकडून प्री-प्रायमरी स्कूलची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याविषयीचा निर्णय झाला असून, अंमलबजावणीलाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. नव्या धोरणानुसार शालेय शिक्षणाची रचना पहिली ते दहावी आणि अकरावी ते बारावी ही बदलण्यात आली आहे.

अंगणवाडीचे शालेय विभागाकडे हस्तांतरण का?

अंगणवाड्यांचे नियंत्रण महिला व बालकल्याण विभागाकडे होते. मात्र, आता पूर्व प्राथमिक शिक्षण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा भाग बनले आहे. त्यामुळे खासगी व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे होणार आहे. त्यामुळे अंगणवाडीचेही हस्तांतरण शालेय शिक्षण विभागाकडे करण्याच्या हालचाली उच्चस्तरावर सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे करावी

पूर्व प्राथमिक शिक्षण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत शिक्षण म्हणून असेल. त्यामुळे हे शिक्षण देणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी शालेय शिक्षण विभागाकडे करावी लागेल. त्यासाठी ॲप आहे. त्यामुळे आतापर्यंत विनानोंदणी चालणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळांवर शालेय शिक्षण विभागाचे नियंत्रण राहणार आहे.

अशी असेल नवीन रचना

  • पायाभूत स्तर हा ३ ते ८ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. त्यात पूर्व प्राथमिकसाठी ३ ते ६ वयोगट असेल आणि ६ ते ८ या वयोगटात दुसरीपर्यंतचे विद्यार्थी असतील. 
  • दुसरा स्तर हा पूर्वाध्ययन स्तर असून, त्यात ८ ते ११ वर्षांतील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्यात तिसरी ते  ५ वीपर्यंतचे विद्यार्थी असतील.
  • तिसरा स्तर हा पूर्व प्राथमिक शाळेचा आहे. त्यात ११ ते १४ वयोगटातील सहावी ते आठवीचे विद्यार्थी असतील. 
  • शेवटचा स्तर हा माध्यमिक असेल. त्यात १४ ते १८ वयोगटाचा  समावेश असून, नववी ते १२वीच्या वर्गाचा समावेश आहे. 
टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी