कंत्राटदारांना दंड माफी नाही

By Admin | Updated: May 18, 2015 00:19 IST2015-05-18T00:15:12+5:302015-05-18T00:19:11+5:30

तुळजापूर : तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत ज्या कंत्राटदारांनी कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, त्यांना दंड करण्यात आला आहे. हा दंड कसल्याही परिस्थितीत माफ केला जाणार नाही,

Contractors do not have a penal apology | कंत्राटदारांना दंड माफी नाही

कंत्राटदारांना दंड माफी नाही



तुळजापूर : तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत ज्या कंत्राटदारांनी कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, त्यांना दंड करण्यात आला आहे. हा दंड कसल्याही परिस्थितीत माफ केला जाणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली आहे.
तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक १७ मे रोजी सर्किट हाऊस येथे पार पडली. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष जयश्री कंदले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राधिकरणाच्या माध्यमातून २००८ मध्ये कामांना मान्यता मिळाली. ती कामे २०१० मध्ये सुरु करण्यात आली. ती आजही सुरुच आहेत. या कामांना गती देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरातील ४२ रस्त्यावर ड्रेनेज, भुयारी गटारी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या पावसाळ्यापूर्वी चेकअप करुन घ्याव्यात. तसेच घरातील सांडपाणी, बाथरुमची कनेक्शन चेंबर्सना जोडून घ्यावे, अशी सूचनाही डॉ. नारनवरे यांनी केली. या कनेक्शनसाठी येणारा खर्च त्या-त्या ग्राहकांकडून घेतला जाणार आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजचे चेंबर उंचीवर असल्याने पावसाळ्यामध्ये हे पाणी रस्त्यावर येवू नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सूचना केली. ड्रेनेज चोकअप झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी १० लाखाची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
शहरामध्ये ३२ लाख रुपये खर्च करुन सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्याची चाचणी घेवून ही सुविधा कार्यान्वित करावी, अशी सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आली.
पथदिवे बसविणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमानवेस मारुती मंदिर रस्ता, एस.टी. स्टँड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी ठिकाणच्या रस्त्यावर पथदिवे बसविण्याबाबतही सदरील बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)
तुळजापूर शहरासाठी पाचुुंदा तलावातून पाईपलाईन करण्यात आली आहे. यावर साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र वीज कनेक्शन अभावी ही योजना सध्या बंद आहे. पालिका प्रशासनाने शहराची गरज लक्षात घेवून वीज कनेक्शन घेवून पाणीपुरवठा चालू करावा, अशी सूचना आ. मधुकरराव चव्हाण यांनी केली.
बोरी धरणावरुन तुळजापूर शहरासाठी राबविण्यात आलेल्या योजनेचे पाईप खराब झाले आहेत. त्यामुळे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात आहे. त्याची दुरुस्तीही तातडीने करण्यात यावी, असे सांगण्यात आले.
पश्चिमेला बसविणार गेट
४साडेपंधरा कोटी रुपये खर्च करुन पापनास तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. परंतु तात्काळ सेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स अथवा अन्य वाहनांना आत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे पश्चिम दिशेला एक गेट बसविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

Web Title: Contractors do not have a penal apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.