थकबाकी पाहून ठेकेदारही हादरले !
By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-27T23:44:06+5:302014-11-28T01:12:43+5:30
राजेश खराडे , बीड बीड विभागीय परिमंडळातून सर्वात अतिरिक्त थकबाकी आहे़ वाढती थकबाकी पाहता मंडळाचे खाजगीकरण होणार असल्याचे समजले होते़

थकबाकी पाहून ठेकेदारही हादरले !
राजेश खराडे , बीड
बीड विभागीय परिमंडळातून सर्वात अतिरिक्त थकबाकी आहे़ वाढती थकबाकी पाहता मंडळाचे खाजगीकरण होणार असल्याचे समजले होते़ मात्र जिल्ह्यातील ग्राहकांची बील भरण्याची मानसिकता नसल्याने खाजगीकरणाचे कोटेशनही भरले नसल्याने मंडळाच्या खाजगीकरणाचा विषय प्रलंबित राहिला आहे़
बीड मंडळाकडे घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती पंपधारक, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग, पथदिवे आदींची वसुली जवळपास ९०० कोटीच्या घरात आहे़ वसुलीचे वाढते प्रमाण पाहता महावितरणचे खाजगीकरण होणार होते़ याकरिता वरिष्ठ पातळीवरून कोटेशनही काढण्यात आले़ जिल्ह्यातील थकबाकी पाहता ठेकेदारांनीही कोटेशन भरले नाही़
जिल्ह्यात सर्वात थकबाकी ही शेती पंपधारकांकडे आहे़ महिन्याकाठी वसुलीचे सरासरी उद्दिष्टही साधले जात नाही़ यामध्ये वाढच होत आहे़ महावितरणची वसुलीत वाढ व्हावी व ग्राहकांना सुविधाही उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने खाजगीकरणाच्या चर्चेला ऊत आला होता़ मात्र औरंगाबाद येथील खाजगी जीटीएल कंपनीने महावितरणाला ४०० कोटी रूपयांचा गंडा बसला होता़ त्यामुळे खाजगीकरण होण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्राहकांची बिले अदा करण्याची मानसिकता नाही़
खाजगीकरणाचा फटका कर्मचाऱ्यांना
मंडळाचे खाजगीकरण झाले तर याचा फटका ग्राहकांबरोबर कर्मचाऱ्यांनाही बसणार आहे़ आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे़ याचा प्रत्यय औरंगाबाद येथील खाजगीकरण झाल्यावर कर्मचाऱ्यांना अनुभवयास मिळाला होता ़कित्येक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती़ त्यामुळे खाजगीकरण हे कर्मचारी-ग्राहकांच्या दृष्टीने घातक आहे़४
खाजगीकरणाची प्रक्रिया ही वरिष्ठ पातळीवरून होत असते़
४यासंबंधी अधिकृत माहिती प्राप्त नसल्याचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले़
४खाजगीकरणाबाबत कोटेशनही निघाले असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली़
४ग्राहकांची बिले भरण्याची मानसिकता नसल्याने ठेकेदारांनी कोटेशन न भरणेच पसंद केले़