कमी दराच्या निविदेवर पाणी सोडत भावखाऊ कंत्राटदाराला ठेका

By Admin | Updated: December 7, 2015 01:00 IST2015-12-07T00:42:19+5:302015-12-07T01:00:42+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड पिण्याच्या पाण्यासाठीचे टँकर टेंडर कमी दराने मागणी करणाऱ्यांना डावलून जास्तीचे दर लावलेल्या ठेकेदाराला टेंडर दिले आहे. याबाबत पाणीपुरवठा

Contracting contractual contractor to drop water tariff | कमी दराच्या निविदेवर पाणी सोडत भावखाऊ कंत्राटदाराला ठेका

कमी दराच्या निविदेवर पाणी सोडत भावखाऊ कंत्राटदाराला ठेका


व्यंकटेश वैष्णव , बीड
पिण्याच्या पाण्यासाठीचे टँकर टेंडर कमी दराने मागणी करणाऱ्यांना डावलून जास्तीचे दर लावलेल्या ठेकेदाराला टेंडर दिले आहे. याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी सदरील प्रकरणातील दराची छाननी करून तात्काळ अहवाल पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना शनिवारी दिले.
२०१६ या वर्षासाठी जिल्हयात पिण्याचे पाणी पुरवठ्याच्या निविदा जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविल्या होत्या. यामध्ये एकूण आठ ठेकेदारांच्या निविदा ओपन केल्या होत्या. यामध्ये ज्या ठेकेदारांच्या निविदेतील दर कमी आहेत त्यांना पुढील वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा ठेका देणे अपेक्षीत होते. मात्र ज्यांच्या निविदाचे दर कमी आहेत अशा ठेकेदाराला डावलून जास्त दर असलेल्या ठेकेदारालाच जिल्हा प्रशासनाने पुढील वर्षीचे टँकर टेंडर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कमी दर असलेल्या ठेकेदाराला निवड समितीने चक्क डावलले असल्याचा प्रकार दरपत्रकावरून पुढे येत आहे.
टेंडरचे कमी दर असतानाही जास्त दर लावलेल्या ठेकेदारांना टेंडर दिले गेले यामागचे कारण काय याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. टेंडर देण्याबाबत बड्या नेत्यांच्या शिफारशी असल्याचे बोलले जाते. याबाबत अपर जिल्हाधिकारी आर. एस. जगताप म्हणाले, मी केवळ निविदा ओपन केल्या आहेत. याबाबत मी काही सांगू शकत नाही.
दिवसाकाठी पाच लाखांचा तोटा
जिल्ह्यातील टंचाई लक्षात घेता व कृती आराखड्यानुसार भविष्यात ८०० ते हजार टँकर पाणी पुरवठ्यासाठी लागणार आहेत. ठेक्याचे दर जास्त असलेल्यांना ठेका दिल्याने दिवसाकाठी एका टँकरमागे ५५२ रूपयांचा तोटा शासनाला होत आहे.
याप्रमाणे एक हजार टँकरचे दिवसाला पाच लाख दोन हजार रूपये होतात. याचा भुर्दंड शासनाला सहन करावा लागणार आहे. या विरोधात कमी दर निविदा दिलेले रामदास हंगे यांनी आक्षेप घेतला असून, या प्रकरणी प्रधान सचिवांनी अहवाल मागविला आहे.

Web Title: Contracting contractual contractor to drop water tariff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.