पूर्णवादी बँकेवर फडकला निरंतर पॅनलचा झेंडा

By Admin | Updated: April 22, 2015 00:41 IST2015-04-22T00:19:18+5:302015-04-22T00:41:03+5:30

बीड : येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर डॉ. निरंतर यांच्या पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत सर्वच्या सर्व पंधराही जागा आपल्या ताब्यात घेत यंदाही आपले वर्चस्व त्यांनी कायम ठेवले

Continuous panel flag flown to a full-fledged bank | पूर्णवादी बँकेवर फडकला निरंतर पॅनलचा झेंडा

पूर्णवादी बँकेवर फडकला निरंतर पॅनलचा झेंडा


बीड : येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर डॉ. निरंतर यांच्या पॅनलने वर्चस्व प्रस्थापित करीत सर्वच्या सर्व पंधराही जागा आपल्या ताब्यात घेत यंदाही आपले वर्चस्व त्यांनी कायम ठेवले. विशेष म्हणजे अनेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली असल्याने परिवर्तनास मतदारांनी सपशेल नाकारले असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
बीड शहरातील मजूर संस्था कार्यालयात सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळपासूनच डॉ. निरंतर यांचे पॅनल आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम राहिली. पंधरा जागांसाठी ३२ उमेदवार रिंगणात होते. रविवारी त्यासाठी मतदान झाले होते. ७ हजार ६४५ सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी परिवर्तन हवे यासाठी विरोधकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र त्यांना यंदाही यश मिळाले नाही. पंधराच्या पंधरा जागांवर ताबा मिळवून परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवूण टाकण्यात यश मिळाले आहे. निकाल मंगळवारी रात्री ९ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस. जगदाळे यांनी जाहीर केला. मात्र ६ वाजल्यापासूनच गुलालाची उधळण सुरु होती. यानंतर एकच जल्लोष साजरा करण्यात आला. स.नि.अधिकारी आर.एस. ठोसर, सुनील जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
निवडणुकीत विजयी झालेले निरंतर पॅनलचे उमेदवार
सर्वसाधारण- निरंतर अरूण गोविंद (६५१२),वैद्य शरदराव रामचंद्र (६३६८), बाहेगव्हाणकर मधुकर शामराव (६३४४), लऊळकर जयंत सदाशिव (६३३७), शिरपूरकर जगदीश अनंतराव (६२३८), मानुसमारे विश्वनाथ (६२२९), कलंत्री ओमप्रकाश आसाराम (६२१९),देशपांडे अमित श्रीकांत (६१९०), तेंडुलकर सुहास मंगेशराव (६११८), देशपांडे किरण सुरेशराव (६१७५), महिला प्रवर्ग- रायते कुसुम शरदराव (६४६१), हुलजुते सरोज शहादेव (६२६३), भ.जा.वि.ज.-सानप चंद्रकांत भोजीबा (६४६१) अनु. जाती- सवाई रामराव किसनराव (६४६२), इ.मा.व.- क्षीरसागर पांडुरंग नामदेव (६५२९).

Web Title: Continuous panel flag flown to a full-fledged bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.