सातत्य व कठोर परिश्रमानेच हमखास यश मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 23:44 IST2017-04-16T23:42:01+5:302017-04-16T23:44:28+5:30
जालना: कोणत्याही कामात सातत्य आणि मेहनत घेतल्यास यश हमखास मिळतेच, असे मत प्रसिद्ध दिग्ददर्शक तसेच बुगीवुगी या डान्स शोचे निर्माते नावेद जाफरी यांनी व्यक्त केले.

सातत्य व कठोर परिश्रमानेच हमखास यश मिळते
जालना: कोणत्याही कामात सातत्य आणि मेहनत घेतल्यास यश हमखास मिळतेच, असे मत प्रसिद्ध दिग्ददर्शक तसेच बुगीवुगी या डान्स शोचे निर्माते नावेद जाफरी यांनी व्यक्त केले. जालना येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त ते आले असता त्यांनी लोकमतशी रविवारी संवाद साधला. नावेद म्हणाले की, बुगीवुगी हा शो प्रचंड गाजला. सुमारे १५ वर्षे सातत्याने हा शो सुरू होता. आजच्या घडीला अशा शोमधूनच नवीन कलाकार, नृत्य कलाकार घडत आहेत. बुगीवुगीमधूनही असंख्य कलाकार आज घडले आहे. ते एका उंचीवर जाऊन पोहचले आहेत. शेवटी कोणतीही कला असो अथवा तुमचे काम तुम्ही मनापासून केलेली निवड आणि चिकाटीने ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेण्याचा सल्ला यांनी तरूणांना दिला. कारण काळा स्पर्धेचे असल्याचे सांगून सिनेमा जगत मोठे आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे काम कसे करता यावरच सर्व काही अवलंबून आहे. बुगीवुगी पुन्हा सुरू करणार का? यावर त्यांनी बुगीवुगी नाही पण त्या सारखा दुसरा शो करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तयारीही सुरू असल्याचे सांगितले. जाफरी यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. डान्सशोसोबतच काही चित्रपट निर्माणबाबतही त्यांनी माहिती दिली. यावेळी प्रवीण जैस्वाल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)