शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

मीटर तपासणीत अनेक बाबी पुढे

By admin | Updated: July 13, 2017 00:20 IST

हिंगोली : शहरातील विविध भागात पालिकेने १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले आहे. येत्या काही दिवसांत २४ घंटे नळाला पाणी सोडण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील विविध भागात पालिकेने १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले आहे. येत्या काही दिवसांत २४ घंटे नळाला पाणी सोडण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यानुषंगाने शहरातील एका भागाचे परीक्षण घेण्यासाठी एमजीपीने तपासणीस सुरुवात केली असता, अनेकजण मीटर बाजूला ठेवून तर, कायमचे मीटर घरात ठेवत पाणी भरत असल्याचे उघडकीस आले. नगरपालिकेने आता पाणीपुरवठा योजनेकडे लक्ष केंद्रित केले आहे. पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी आधीच मीटर बसविले आहेत. तरीही अनेकजण पाणी मनमानी पद्धतीनेच वापरतात. विशेष म्हणजे काहींनी तर मीटरच काढून टाकले. काहींनी ते उलट्या बाजूने बसविले. इतरही अनेक प्रकार केल्याचे समोर येत आहे. शहरात नळाला २४ घंटे पाणी उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिकेतर्फे नळाला मीटर बसविण्याचे काम एका कंपनीला दिले होते. कंपनीने शहरात तब्बल १२ हजार ५०० मीटर बसविले असता २ हजार ५०० नळांचे मीटर काढून टाकण्यात आल्याचे एमजीपीच्या सर्वेक्षणात आढळून आले. तर एक भाग पूर्ण करण्यासाठी जिजामातानगरची निवड केली असता, त्या ठिकाणी एकूण ४२७ मिटर बसवले होते. मात्र २०८ ठिकाणीच नळाला मीटर दिसले. तर काहींचे रिडींग शून्य असल्याचे दिसून आले. १४१ मीटर घरात काढून ठेवल्याचे आढळून आले. तर नागरिकांच्या चर्चेतून वेगळ्याच बाबी पुढे आल्या. काही जण म्हणतात, मीटरमुळे पाणी कमी येते, पाण्याच्या हवेनेच मीटर फिरते, अशी एक ना अनेक कारणे सांगितली जात आहेत.