कंटेनर- ट्रक अपघातात दोन ठार
By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:47:13+5:302014-06-19T00:17:39+5:30
बीड: तालुक्यातील नामलगाव फाटा परिसरात कंटेनर व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली.

कंटेनर- ट्रक अपघातात दोन ठार
बीड: तालुक्यातील नामलगाव फाटा परिसरात कंटेनर व ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महंमद आझाद अब्दुल गफूर (वय २५) व महमंद सारुख महंमद इस्त्राईल अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असून दोन्ही मयत हे हरियाणा राज्यातील चिल्ला, ता. तावडू जि. मेवात येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर क्र-एचआर-५५ जे-९०३६ व ट्रक क्र. एमपी-०९ एचएच-०३४९ यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कंटेनरमधील दोन जण ठार झाले तर समोरील ट्रकमधील एक जण जखमी झाला. सदरील घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिस व शहर वाहतुक पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी व्यक्ती व अपघातात ठार झालेल्यांचे शव जिल्हा रुग्णालयात आणले. ठार झालेल्यांच्या व्यक्तींची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)