शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरजवळ कंटेनर उलटून बिअरचे बॉक्स रस्त्यावर; नागरिकांची मदतीऐवजी लूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:38 IST

या परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता स्वच्छ करण्याबरोबरच जमाव पांगवण्यासाठीही पाण्याचा मारा केला.

वाळूज महानगर : येथील रांजणगाव शेणपुंजी फाट्यावर शुक्रवारी रात्री बिअरने भरलेला कंटेनर पलटी होताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकून मदतीसाठी विव्हळत असतानाही काहींनी मानवी मूल्यांना हरताळ फासत रस्त्यावर विखुरलेल्या बिअरच्या बॉक्सची लुटालूट केली. अपघातानंतर जवळपास दोन तास वाहतूक ठप्प होऊन, रस्त्यावर बिअर आणि डिझेल पसरलेले होते. तसेच लुटालूट रोखण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.

दि. २८ रोजी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान बिअरची वाहतूक करणारा कंटेनर अचानक पलटी झाला. लीलासन या बिअर उत्पादक कंपनीतून टूबर्गच्या काचेच्या बाटल्या आणि टीन पॅकमधील जवळपास दोन हजार बॉक्स घेऊन जळगावकडे जात असलेला हा कंटेनर धनुष्यबाण कमानीजवळ वळण घेत असताना तोल जाऊन रस्त्यावर आडवा पडला. बाटल्या फुटल्याने रस्त्यावर बिअर सांडली होती. तसेच कंटेनरमधून गळलेले डिझेल मिसळल्याने संपूर्ण रस्ता निसरडा झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे, वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने पाणी मारून बिअर आणि डिझेल दूर करण्याचे काम हाती घेतले. रांजणगाव येथील सरपंच, काही पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

अग्निशमन जवानांनी गर्दी पांगवण्यासाठी केला पाण्याचा माराया परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्ता स्वच्छ करण्याबरोबरच जमाव पांगवण्यासाठीही पाण्याचा मारा केला. जोरदार पाण्याच्या फवाऱ्यांमुळे रस्त्यावर उभे असलेले अनेक लोक मागे सरकले.

उर्वरित बिअर कंपनीच्या दुसऱ्या वाहनात हलवलीलुटालूट झाल्यानंतरही काही बॉक्स सुस्थितीत राहिले होते. रात्री उशिरा पोलिसांच्या उपस्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि ट्रान्स्पोर्ट चालकांनी उर्वरित बिअरचे बॉक्स वेगळ्या वाहनात सुरक्षितरीत्या भरून घेतले.

चालकाची सुटकाचालक सय्यद अब्दुल्ला अपघातानंतर केबिनमध्ये कचाट्यात अडकला होता. पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने कटर मशीनच्या साहाय्याने त्याला बाहेर काढले. चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beer truck overturns near Sambhajinagar; people loot instead of helping.

Web Summary : A beer truck overturned near Sambhajinagar, causing chaos. Instead of helping the trapped driver, locals looted beer boxes. Police and fire services responded, controlling the scene and rescuing the driver.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर