शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:39 IST

कंटेनर दुचाकीला जोराची धडक दिली व भरधाव वेगाने निघून गेला.

ठळक मुद्देपाच मित्र सोमवारी रात्री जेवणासाठी बाहेर होते घराकडे परतत असताना दुचाकीला कंटेनरने उडवले

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूजकडूनऔरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१६) पहाटे कामगार चौकालगत घडली. मनोज धोडिंराम वायकर ( ३३, रा. साळेगाव ता. केज. जि. बीड, ह.मु.साईनगर सिडको ) हा मयत झाला असून त्याचा मित्र प्रविण रमेश बांगड (५०, रा. आरएक्स - ७/१२ बजाजनगर) गंभीर जखमी झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, प्रविण बांगड (रा. बजाजनगर), मनोज वायकर (रा. साईनगर सिडको), दिनेश दुधाट, विजय राजगुरु व सोनु परमार (रा. सर्व वडगाव कोल्हाटी) हे ५ जण सोमवारी रात्री ११ वाजता पंढरपूरातील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर पाचही जण हॉटेलच्या बाहेर रस्त्यालगत बराच वेळ गप्पा मारत थांबले होते. मंगळवारी (दि.१६) पहाटे २ वाजेच्या सुमारास ते घरी जाण्यास निघाले. प्रविण बांगड व मनोज वायकर हे दोघे दुचाकीवरुन (एमएच-२०, बीएच- ०१०९) घरी निघाले. कामगार चौकालगत असलेल्या प्रशांत पेट्रोल पंपासमोर अडीच वाजेच्या सुमारास वाळूजकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने बांगड यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली व भरधाव वेगाने निघून गेला. या अपघातात वायकर हा उडून उजव्या बाजूला पडल्याने तो कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. तर बांगड हे डाव्या बाजूला पडल्याने थोडक्यात बचावले आहेत. परंतू त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला व छातीला जोराचा मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूWalujवाळूजAurangabadऔरंगाबाद