वाहनांचा खप बऱ्यापैकी वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:40+5:302021-02-05T04:11:40+5:30

वाहनांचा खप बऱ्यापैकी वाढेल वीस वर्षांनंतर वाहनांना योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस सर्टिफिकेट) सक्ती राहील. जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ...

Consumption of vehicles will increase significantly | वाहनांचा खप बऱ्यापैकी वाढेल

वाहनांचा खप बऱ्यापैकी वाढेल

वाहनांचा खप बऱ्यापैकी वाढेल

वीस वर्षांनंतर वाहनांना योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस सर्टिफिकेट) सक्ती राहील. जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतल्यामुळे किमान १० टक्के वाहनांचा खप वाढेल. हा निर्णय औरंगाबादच्या ऑटोमोबाईल उद्योगांसाठी चांगला आहे. मात्र, सध्या जुनी वाहने स्वेच्छेने स्क्रॅप करावीत, असे आजच्या अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. ‘स्वेच्छेने’ हा शब्द खटकणारा आहे. कदाचित ही सुरुवात असेल. पण, प्रदूषण रोखण्यासाठी हे गरजेचे आहे. दुसरीकडे, टॅक्स बेनिफिटविषयी आजच्या अर्थसंकल्पात फारसे भाष्य केलेले नाही. आता कुठे अर्थचक्र गती घेत आहे. ती गती चालू ठेवणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि ऑटोमोबाईल स्टॅटिजी पाॅलिसी ही ‘एमएसएमई’ व मोठ्या उद्योगांसाठी फायदेशीर आहे.

- अभय हंचनाळ, अध्यक्ष, ‘मासिआ’

Web Title: Consumption of vehicles will increase significantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.