शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

ग्राहक समाधान सर्वेक्षणात औरंगाबाद विमानतळ दहाव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 1:23 PM

नॉन मेट्रो श्रेणीतील सर्वेक्षणात अनेक मापदंडांची पडताळणी

औरंगाबाद : ग्राहक (प्रवासी) समाधान सर्वेक्षणात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळविले आहे.

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने देशातील ५२ विमानतळांवर जानेवारी ते जून २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात ग्राहक समाधान सर्वेक्षण (कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे) केले. त्यानंतर जुलै ते डिसेंबर २०१८ मध्ये दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीच्या गाईडलाईननुसार ३३ मापदंड होते. यात स्वच्छता, पार्किंग, बॅग्ज डिलिव्हरी स्पीड, वॉशरूम सुविधा, ट्रॉली सुविधा, चेक इन लाईन, सुरक्षा, विमानतळावरील कर्मचाऱ्यांची वागणूक, फ्लाईट इन्फॉर्मेशन स्क्रीन, सुरक्षा तपासणीत लागणारा वेळ, शिष्टाचार आणि निरीक्षणात सुरक्षा कर्मचाऱ्यांची वर्तवणूक, इंटरनेट सुविधा, वायफाय, रेस्टॉरंट, एटीएम, मनी एक्स्चेंज आदींसह विमानतळावरील वातावरणाची पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ दहाव्या स्थानी राहिले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला. विमानतळावरील सुविधांविषयी प्रवासी समाधानी असून, आता येथील  विमानांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कनेक्टिव्हिटी महत्त्वाचीग्राहक समाधन सर्वेक्षणात चिकलठाणा विमानतळ दहाव्या क्रमांकावर आले. विमानतळाला सर्वेक्षण समितीने भेट दिली होती. आठ दिवसांपूर्वी हा निकाल समोर आला. ही मोठी गोष्ट असली तरी येथील कनेक्टिव्हिटीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.

हे आहेत टॉप १० विमानतळे१. रायपूर, २. उदयपूर, ३. त्रिची, ४. वडोदरा, डेहराडून, ५.गया, ६. जोधपूर, ७. मदुराई, ८. पोर्ट ब्लेअर, ९. जम्मू. १०. औरंगाबाद विमानतळ. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद