शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास ग्राहक मंचाचा दणका

By admin | Updated: September 17, 2014 01:12 IST

उस्मानाबाद : दोन घोड्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या लासुर्णे (ता़इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रारदारास नुकसानभरपाईपोटी ३ लाख, ४५ हजार रूपये

उस्मानाबाद : दोन घोड्यांच्या निर्बिजीकरण शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या लासुर्णे (ता़इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रारदारास नुकसानभरपाईपोटी ३ लाख, ४५ हजार रूपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले़याबाबत अ‍ॅड़ सचिन देशपांडे यांनी दिलेली माहिती अशी की, आळणी येथील नानासाहेब विठ्ठल कुंभार यांनी त्यांच्या दोन घोड्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया लासुर्णे (ता़इंदापूर जि़पुणे) येथील पशुवैद्यकीय अधिकारी संजय पारडे यांच्याकडून केली होती़ मात्र, शस्त्रक्रियेनंतर दोन्ही घोड्यांचा रक्तस्त्रावाने मृत्यू झाला होता़ या घटनेनंतर कुंभार यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी करून डॉ़ संजय पारडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती़ या तक्रारीनंतर येडशी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक यांनी पशुवैद्यकीय अधिकारी राजकुमार ढवळशंख यांना घोड्यांची उत्तरीय तपासणी करण्यास सांगितले होते़ मात्र, ढवळशंख यांनी तपासणीत टाळाटाळ केली़ त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे कुंभार यांनी तक्रार केली होती़ त्यानंतर कुंभार यांनी अ‍ॅड़ सचिन देशपांडे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये तक्रार दाखल केली होती़ ग्राहक मंचापुढे आलेले पुरावे अ‍ॅड़ देशपांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून डॉ़ पारडे यांनी कुंभार यांना दोन्ही घोड्यांच्या नुकसानभरपाई पोटी ३ लाख ४५ हजार रूपये ९ टक्के व्याजासह ४५ दिवसात द्यावेत, असे आदेश ग्राहक मंचचे अध्यक्ष एम़व्हीक़ुलकर्णी, सदस्य मुकुंद बी़सस्ते यांनी दिले़ तसेच पशुवैद्यकीय अधिकारी राजकुमार ढवळशंख यांनी मयत घोड्यांच्या उत्तरीय तपासणीत कर्तव्य कसूर केल्याची वरिष्ठ कार्यालयाने दखल घेवून कारवाई करावे, असेही आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)