कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेसह ग्राहक अटकेत
By Admin | Updated: March 22, 2017 16:24 IST2017-03-22T16:23:02+5:302017-03-22T16:24:37+5:30
मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगरातील एका घरात खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर गुन्हे शाखेच्या

कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेसह ग्राहक अटकेत
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगरातील एका घरात खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा मारला. या छाप्यात एका महिले सह एक ग्राहकास पोलिसांनी अटक केली आणि तीन तरुणींची मुक्तता केली. मुकुंदवाडी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संगीता खरे उर्फ शेजवळ (३७,रा.स्वराजनगर)आणि ग्राहक सर्जेराव जाधव (रा. मुकुंदवाडी)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सांगितले की, मुकुंदवाडी रेल्वेपटरी परिसरातील स्वराजनगर येथील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दोन सरकारी पंचाना सोबत घेऊन दोन बनावट ग्राहक आंटीच्या घरी पाठविले. यावेळी तिने तीन तरुणी त्यांच्यासमोर उभ्या केल्या आणि प्रत्येकी एक हजार रुपये त्यांचा रेट असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी एवढे पैसे नसल्याचे सांगून हजार रुपयांमध्ये त्यांना तरुणी उपभोगायला देण्याची तयारी दर्शविली. शिवाय तिच्याच घरातील रिकामी खोली उपलब्ध केली. यावेळी संगीता ही घरातच कुंटणखाना चालवित असल्याचे सिद्ध होताच बनावट ग्राहकांनी पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा मारला.या छाप्यात तीन तरुणींची मुक्तता करण्यात आली. शिवाय या महिलेसह ग्राहकाविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदविला. बुधवारी सकाळी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस उपनिरीक्षक विजय पवार, कर्मचारी नबाब पठाण आणि अन्य कर्मचाऱ्यांनी केली. तिच्या घरात रोख बारा हजार रुपये आणि कंडोमचे पाकिटे पोलिसांना आढळले आहेत.
बँक खात्यात चार लाख रुपये
पतीपासून विभक्त राहणाऱ्या संगीताचे दोन बँकेत खाते असून, या खात्यात सुमारे ४ लाख रुपये आहेत. तिने याच एरियात दुसऱ्या घराचे बांधकाम सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली. वेश्या व्यवसाय करण्यासाठी तिने बोलविलेल्या तरुणींना ती प्रती ग्राहकासाठी ४००रुपये देत आणि स्वत: ६००रुपपये घेत, होती असे पोलिसांनी सांगितले.