‘त्या’ जागेची बांधकाम परवानगी रद्द

By Admin | Updated: June 9, 2017 01:02 IST2017-06-09T01:01:35+5:302017-06-09T01:02:08+5:30

जालना : नगरभूमान क्रमांक ४६६५६ या जागेवर बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली बांधकाम परवानगी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी रद्द केली.

Construction of 'that' space allowed | ‘त्या’ जागेची बांधकाम परवानगी रद्द

‘त्या’ जागेची बांधकाम परवानगी रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नगरभूमान क्रमांक ४६६५६ या जागेवर बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली बांधकाम परवानगी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी गुरुवारी एका आदेशाद्वारे रद्द केली.
मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की सदर जागेवर बांधकाम करण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रशांत छबुराव कसबे यांनी जालना नगरपालिकेत मार्च २०१७ मध्ये प्रस्ताव दाखल केला. प्रस्तावासोबत दाखल मालकी हक्काच्या कादपत्रानुसार नगरपालिकेने मे २०१७ मध्ये बांधकाम परवानगी दिली. मात्र, या संदर्भात माजी नगरसेवक वैभव उगले आणि मराठवाडा प्रंताचे धर्मगुरू बिशप एम.यू.कसाब यांनी आक्षेप दाखल केला आहे. त्या आधारे सदर जागेची बांधकाम परवानगी रद्द करण्यात येत आहे. सदर कुठल्याही प्रकारचे बांधकाम केल्यास कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या आधारे याच जागेचे पीआरकार्ड तयार करून डॉ. फ्रेजर बॉईज शाळेची ५० कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार संशयितांवर काही दिवसांपूर्वी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Construction of 'that' space allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.