बाजार समितीत नव्या टीनशेडची उभारणी
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-14T00:14:51+5:302014-07-14T01:03:10+5:30
सेनगाव : येथील बाजार समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय संचालक मंडळाने बाजार समिती विकासाकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.

बाजार समितीत नव्या टीनशेडची उभारणी
सेनगाव : येथील बाजार समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय संचालक मंडळाने बाजार समिती विकासाकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या खरीप हंगामापर्यंत शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीकरिता दोन टीन शेड उभारण्यात येणार असल्याची माहिती सभापती नारायण खेडकर यांनी दिली.
येथील बाजार समितीत शेत मालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असली तरी त्या प्रमाणात भौतिक सुविधा नसल्याने नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळाने विविध विकासकामे तातडीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे धान्य ठेवण्यासाठी दोन शेड, अंतर्गत सिमेंट रस्ते, सांडपाणी निवारण, अंतर्गत विद्युतीकरणाची कामे, प्राधान्याने करण्यात येणार असून त्या करीता पणन संचालकाकडे नवीन विकास आराखडे, कामास मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती सभापती खेडेकर यांनी दिली. प्रशासकीय संचालक मंडळाच्या कालावधीत बाजार समितीचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असून बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. खरीप हंगामादरम्यान दोन टीन शेड उभारुन शेतकरी, व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय थांबविणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले. (वार्ताहर)