माजलगावात दिवसाला दीड लाख लिटर पाणी बांधकामास
By Admin | Updated: March 30, 2016 00:51 IST2016-03-30T00:22:14+5:302016-03-30T00:51:11+5:30
माजलगाव : येथील तहसीलदारांनी तीन महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने बांधकाम परवाना देण्यात येऊ नये,

माजलगावात दिवसाला दीड लाख लिटर पाणी बांधकामास
माजलगाव : येथील तहसीलदारांनी तीन महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने बांधकाम परवाना देण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मागील तारखेत परवाने घेऊन बांधकामे सुरू आहेत. दिवसाला दीड लाख लिटरपेक्षा जास्त पाणी बांधकामावर वाया जात आहे.
दुष्काळाची झळा पाहता येथील तहसीलदार डॉ. अरूण जराड यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी सी गावित यांना एक पत्र पाठवून शहरात नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, असे आदेश दिले असतानाही मागील तारखेत परवाने येथील कर्मचारी देत आहेत. तर शहरात सध्या शेकडो अनधिकृत बांधकामे सुरू असुन शहरात मोठया प्रमाणावर नियमबाह्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू असताना व या बाबत अनेकांनी तक्र ारी केल्या आहेत.
असे असताना देखील याची कसलीच दखल पालिकेने घेतलेली नाही. सध्या शहरात नियमबाह्य व विनापरवाना शेकडो बांधकाम व व्यापारी संकुलाची कामे सुरु आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा गैरवापर होताना दिसत आहे. (वार्ताहर)