स्वातंत्र्यदिनी होणार संविधान मोर्चाची स्थापना

By Admin | Updated: July 3, 2016 00:25 IST2016-07-03T00:11:18+5:302016-07-03T00:25:06+5:30

जालना : जिल्ह्यात सध्या संविधानाला डावलून काम सुरू आहे. हे थांबविण्यासाठी १५ आॅगस्टला मुंबईत संविधान मोर्चाची स्थापना करण्यात येणार असून

Constitution of the Independence Day Constitution will be established | स्वातंत्र्यदिनी होणार संविधान मोर्चाची स्थापना

स्वातंत्र्यदिनी होणार संविधान मोर्चाची स्थापना


जालना : जिल्ह्यात सध्या संविधानाला डावलून काम सुरू आहे. हे थांबविण्यासाठी १५ आॅगस्टला मुंबईत संविधान मोर्चाची स्थापना करण्यात येणार असून यामध्ये राज्यातील सर्व संघटनांना समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.डॉ.सुरेश माने उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत यांनी मोदी सरकारवड कडाडून टिका केली. हे सरकार केवळ जातीयवादावरच निवडून आले आहे. हे नष्ट करून संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठीच संविधान मोर्चाची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी राज्यात बैठका घेतल्या जात आहेत. ३१ जुलै रोजी सर्व संघटनांची व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Constitution of the Independence Day Constitution will be established