भोकरच्या कॉन्स्टेबलची आत्महत्या
By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:16:52+5:302014-06-30T00:38:40+5:30
नांदेड : पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने क्रांतीचौक पोलीस कॉलनी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोकरच्या कॉन्स्टेबलची आत्महत्या
नांदेड : पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने क्रांतीचौक पोलीस कॉलनी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हनुमंत रामराव संकमवाड (४०, मूळ रा. भोकर, जि. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत संकमवाड हे औरंगाबाद शहर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी सकाळी त्यांची पत्नी आणि एक मुलगी सत्संग कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तर एक मुलगी कामानिमित्त घराबाहेर गेली. त्यावेळी संकमवाड हे घरीच बसलेले होते. त्यानंतर त्यांनी क्रांतीचौक पोलीस कॉलनीत राहत असलेल्या क्वॉर्टरमध्ये नायलॉन दोरी पंख्याला बांधून गळफास घेतला.
दुपारी त्यांची पत्नी आणि मुली घरी गेल्या तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी या घटनेची माहिती क्र ांतीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. टी. सी. काढण्यावरून पती-पत्नीमध्ये सकाळी कुरबुर झाली होती, असे असले तरी त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)