शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे व्यापारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:32 IST

महावितरणने ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू केले आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा रोड येथील व्यावसायिक उलाढालीवर सुमारे ६० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणने ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू केले आहे. यामुळे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा रोड येथील व्यावसायिक उलाढालीवर सुमारे ६० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. दररोज दुपारी ३.३० ते ७.३० वाजेपर्यंत भारनियमन होत असल्याने व्यापा-यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.मछली खडक रोड कपडा, मिठाई मार्केट म्हणून ओळखले जाते. दसरा-दिवाळीदरम्यान या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असते, पण नोटाबंदी व जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर येथील उलाढालीवर परिणाम झाला. त्यात ‘तेल’ ओतण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत भारनियमन सुरू केल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका येथील व्यावसायिकांना बसू लागला आहे. ऐन ग्राहकीच्या वेळी चार तास लाईट गुल होत आहे. प्रत्येक दुकानात इन्व्हेटर नाही. ज्या दुकानात इन्व्हेटर आहेत तेथे उजेड असतो, पण रस्त्यावर मात्र, अंधार असतो. यामुळे ग्राहकही या बाजारात येणे टाळत आहे. यासंदर्भात मिलन मिठाईचे शरद परिहार यांनी सांगितले की, हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. आता ६ वाजेच्या आत अंधार होत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सायंकाळी सुरू होते. पण ७.३० वाजेपर्यंत भारनियमन असल्याने ग्राहकही आता खरेदीसाठी येणे टाळत आहे. एखाद्या दुकानातून ग्राहक गेला तर पुन्हा लवकर येत नाही. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय ग्राहकीही तुटत आहे, असा दुहेरी फटका व्यावसायिकांना बसत आहे.व्यापारी अजय तलरेजा यांनी सांगितले की, दसरा-दिवाळीदरम्यान १५ दिवसांच्या उलाढालीत व्यापारी तीन महिन्यांची उलाढाल कव्हर करीत असतो. हे दोन्ही सण व्यापाºयांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात जर भारनियमन होत असेल तर व्यापाºयांमध्ये संताप होणे साहजिकच आहे. आधीच नोटाबंदी व नंतर जीएसटीमुळे व्यापार बुडीत निघाला आहे. नोकरदारांचेही पगार देणे कठीण झाले आहे. व्यापारी अनेक अडचणीला तोंड देत असताना त्यात भारनियमनाने भर टाकली आहे. महावितरणने कोणत्याही परिस्थितीत सणासुद्धीत भारनियमन करू नये, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.