शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

साथ रोगाचा जिल्ह्याला विळखा

By admin | Updated: August 28, 2014 01:40 IST

लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून हिवतापाचे २० रुग्ण आढळले. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ चिकुनगुनियाचे ५ रुग्ण तर डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले असून, यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़

लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून हिवतापाचे २० रुग्ण आढळले. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ चिकुनगुनियाचे ५ रुग्ण तर डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले असून, यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ आॅगस्ट महिन्यात १० रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आले आहेत़ अजून ३० रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी गुरुवारी पाठवण्यात येणार आहेत़ हिवताप, चिकुनगुन्या, डेंग्यूच्या साथरोगाने त्रस्त झाले असून या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ लातूर जिल्हात जून महिन्यापासून ते सद्य:स्थितीत हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या साथरोगाने नागरिक हैराण झाले आहेत़ लातूर महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात सपशेल अपयशी ठरत आहे़ शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्याचा परिणाम म्हणून शहरात साथरोग प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे़ तापीचे लक्ष्मी कॉलनी ११ रुग्ण तर गाजीपुरा भागात ९ रुग्ण असे २० रुग्ण आढळून आले. त्यातील २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ ग्रामीण भागातही तापीचे १४ रुग्ण आढळून आले आहेत़ चिकुनगुन्याचे बन सावरगाव येथील ११ तापाचे रुग्ण आढळून आले़ अकराही रुग्णांच्या रक्तजल नमुन्याची तपासणी सेंटिनल सेंटर नांदेड येथे तपासणीसाठी पाठवले असता़, त्यापैकी ५ रुग्ण चिकुनगुनिया दूषित आढळून आले़ हे ५ ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत़ जून महिन्यात ४० रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठवले असता त्यात ६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले़ जुलै महिन्यात ४५ संशयीत रुग्णाचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील ८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले़ आॅगस्ट महिन्यात २२ संशयीत रुग्णाचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील १० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले़ दुसऱ्या लॉटमध्ये ३० संशयित रुग्णांचे रक्तजल नमूने तपसणीसाठी गुरुवारी पाठवण्यात येणार आहेत़ १० रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे़ त्यातील ८ रुग्ण शहरातील असून २ रुग्ण हे ग्रागीण भागातील म्हाडा कॉलनी व शंकरवाडी येथील आहेत़ डेंग्यूची रुग्ण संख्या शहरात झपाट्याने वाढत असून गुरुवारी अजून ३० डेंग्यू संशयीत रुग्णांची रक्तजल नमुने तपसणीसाठी पाठवण्यात येणार आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होवू शकते़ या साथ रोगांनी शहरातील व जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ रुग्णसंख्येत होणारी वाढ पहाता साथ रोग नियंत्रण विभाग व आरोग्य विभागाची अकार्यक्षमता दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)