शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळ : शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:24 IST

महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

ठळक मुद्देशिवसेनेचीही स्वबळावर तयारी भारतीय जनता पक्षामध्येही उत्सुकता 

औरंगाबाद : महापालिका निवडणुका केव्हा होणार हे सर्वाेच्च न्यायालयातील निकालानंतरच  स्पष्ट होणार असले तरी काँग्रेसचे औरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. 

देशमुख यांचे विधान पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती देण्यासाठी असू शकते. त्यांनी स्वबळाची भाषा जरी केली असली तरी निर्णय तर वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे मत शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी आहे. औरंगाबाद महापालिकेत एप्रिल २०२० पर्यंत शिवसेना-भाजप सत्तेत होते. ११५ नगरसेवकांच्या आकड्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० ते १२ नगरसेवक होते. सोबत एमआयएमचे २६ नगरसेवक होते. उर्वरित सत्तेचा आकडा शिवसेना-भाजपच्या बाजूने होता. मनपाच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चितता आहे. 

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक कधी होईल, हे स्पष्ट होणार असले तरी कार्यकर्त्यांमध्ये जीव ओतण्याच्या भूमिकेतून शिवसेना आणि काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपसमोर पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित जाण्याचे मनसुभे ठेवलेले असताना काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार जरी असले तरी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही आघाडी होणार की नाही, याबाबत आता आघाडीतील तिन्ही पक्षांसह भाजपमध्येही उत्सुकता आहे. 

संपर्कमंत्री देशमुख म्हणाले होते...काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी स्वबळावरच लढते. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकादेखील काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेत्त आहेत. मग तीच आघाडी महापालिकेच्या निवडणुकीत कायम न राहण्यामागे नेमके कारण काय आहे, यावर संपर्कमंत्री देशमुख यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी स्वबळावर निवडणूक लढण्याची असल्याचे सांगितले होते. 

आम्हीही ११५ वार्डांची तयारी केली आहेशिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, काँग्रेसचे मंत्री देशमुख यांचे मत पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्यासाठी असेल. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेनेदेखील ११५ वॉर्डांमध्ये पूर्ण क्षमतेने वॉर्डनिहाय बैठका घेत तयारी केली आहे. 

...तर राष्ट्रवादीही स्वबळावरचराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजयराज साळवे यांनी सांगितले, महाविकास आघाडी होण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. महाविकास आघाडीत निवडणूक होईल; पण काँग्रेस जर स्वबळाची भाषा करीत असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्हीदेखील ११५ वॉर्डांमध्ये बैठकांसह आढावा घेत तयारी केली आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस