तुळजापुरात काँग्रेसचा दारूण पराभव
By Admin | Updated: April 21, 2016 00:59 IST2016-04-20T23:54:29+5:302016-04-21T00:59:33+5:30
तुळजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोराचा झटका देत महाआघाडीने

तुळजापुरात काँग्रेसचा दारूण पराभव
तुळजापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोराचा झटका देत महाआघाडीने १८ पैकी १६ जागा ताब्यात घेवून निर्विवाद वर्चस्व मिळविले़ राष्ट्रवादीचे सर्वाधिक १० उमेदवार विजयी झाले झाले़ महाआघाडीने काँग्रेसची एक दोन नव्हे तब्बल १५ वर्षांची सत्ता महाआघाडीने खालसा करून काँग्रेसचा सुपडासाफ केला आहे़
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच काँग्रेस विरूध्द महाआघाडीची मोट बांधण्यासाठी विरोधकांनी एकत्रित प्रयत्न केले़ त्यानुसर निवडणुकीत काँग्रेसच्या श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलविरुद्ध महाआघाडीचे शेतकरी विकास आघाडी पॅनल अशी सरळ लढत झाली़ सत्ताधारी काँग्रेसने १८ उमेदवार उभा केले होते. तर महाआघाडीतील राष्ट्रवादीने ११, भाजपाने ४ व शिवसेनेने ३ जागांवर उमेदवार उभा केले होते़ या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यापर्यंत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या़ या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया मंगळवारी झाली़ तर निकाल ऐकण्यासाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहासमोर मोठी गर्दी केली होती.
निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागांपैकी १० जागा, भाजपाने ४ जागेपैकी ४ तर शिवसेनेने ३ जागेपैकी २ जागा मिळवून महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले़
विजयी उमेदवारांमध्ये महाआघाडीचे सोसायटी मतदार संघातून सर्वसाधारण उत्तम लोमटे (४६३), विजयकुमार गंगणे (४५२), सत्यवान सुरवसे (४५६), राजेंद्र मुळे (४५६), महेबुब पठाण (४४९), अनिल जाधव (४३९), मल्लिनाथ जेवळे (४२८), सोसायटी महिला राखीव संजीवनी माळी (४८३), विजयाबाई पाटील (४७६), सोसायटी इतर मागासवर्गीय मतदार संघ बबन ढगे (४८४), सोसायटी भटक्या विमुक्त जाती-जमाती अरविंद पाटील (४८८), ग्रामपंचायत सर्वसाधारण संजय भोसले (४२२), यशवंत लोंढे (४१५), ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अंगद जाधव (४०९), ग्रामपंचायत अ. जाती-जमाती सखुबाई चंदनशिवे (४३२), हमाल मापाडी मतदार सुहास साळुंखे (४०) तर व्यापारी मतदार संघातून काँग्रेसचे बालाजी रोचकरी (१३०) व अपक्ष उमेदवार शिवराज पाटील ९७ यांनी मते घेवून विजय मिळविला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एल. शहापूरकर यांनी काम पाहिले. महाआघाडीला बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रवादी, भाजपा, सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजीत गुलालाची उधळण केली़ तसेच विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली़
महाआघाडीच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेता महेंद्र धुरगुडे, विक्रमसिंह देशमुख, अशोक जगदाळे, धैर्यशील पाटील, किशोर गंगणे, वसंत वडगावे, प्रतापसिंह सरडे, विकास चव्हाण, विनोद गंगणे, अविनाश गंगणे, काका बंडगर, सुभाष पाटील, गणेश सोनटक्के, सत्यवान सुरवसे, रोहन देशमुख, अनिल काळे, बाळासाहेब शामराज, बलभीम लोंढे, धनंजय गंगणे, विपीन शिंदे, नारायण नन्नवरे, भाजपाचे अनिल काळे, प्रभाकर मुळे, श्रीकांत सुरवसे, विजय शिंगाडे, रोहन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद गंगणे, विक्रम देशमुख, दीपक आलुरे, महेंद्र धुरगुडे, वसंत वडगावे, जीवन गोरे, आनंद कंदले, सेनेचे गणेश सोनटक्के, सुधीर कदम आदींनी परिश्रम घेतले़(वार्ताहर)