शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिंकली, भाजपा हरली, राष्ट्रवादी तरली

By admin | Updated: January 21, 2015 01:10 IST

मधुकर सिरसट ,केज सोमवारी नगर पंचायतच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरला. सदरील निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी सर्वात जास्त म्हणजे ८ जागा जिंकून नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले

मधुकर सिरसट ,केजसोमवारी नगर पंचायतच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक ठरला. सदरील निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी सर्वात जास्त म्हणजे ८ जागा जिंकून नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. देशात, राज्यात आणि केज विधानसभेच्या आमदार भाजपचे असतानाही त्यांना सत्ता मिळविता आली नाही.पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपासाठी अनुकुल असलेल्या नेत्यांना वातावरणाचा लाभ मिळविता आला नाही. पक्षांतर्गत बंडखोरीच्या उमेवारांमुळे या निवडणुकीत भाजपाला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले तर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वास टाकलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांना फक्त दोन जागा मिळाल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत तरली आहे. केज नगरपंचायतीची निवडणूक मराठवाड्यात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत डिजिटल बॅनर, ध्वनीक्षेपकाचा सुमार वापर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विरोधीपक्ष नेते आ. धनंजय मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. प्रा. संगीता ठोंबरे यांच्या जाहीरसभांनी वातावरण ढवळून गेले होते. गेल्या पंचवार्षिक कालावधीपैकी शेवटची अडीच वर्षे काँग्रेसची सत्ता नगर पंचायतवर होती. याच काळात खा. रजनी पाटील यांनी स्वत:चा दोन कोटीचा खासदार निधी आणि तत्कालिन मुख्यमंत्री तथा ग्रामविकास मंत्रालय यांच्याकडून केजच्या विकास कामांसाठी मिळविलेल्या ११ कोटींचा निधी या भरीव निधीमुळे काँग्रेसने केज शहरात विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. राज्य महामार्गावरील रस्ता दुभाजक, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज, भगवानबाबा चौक, भवानी चौकाचे सुशोभिकरण व हायमास्ट दिव्याची झळाळी यामुळे केज शहर उजळून गेले होते. रस्ते, नाल्या, अग्नीशामक दलाची गाडी, घरोघरी घंटागाडीची सुविधा अशा विविध कामांमुळे काँग्रेसबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली होती. खा. रजनी पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला व आगामी जाहीरनाम्याचा पाढा वाचला. व्यापारी संकुलासाठी फलोत्पादन खात्याची जमीन हस्तांतर करण्यासाठी झालेला प्रयत्न हे खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडले. माजी मुख्यमंत्री चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जाहीरसभेमुळे मतदारात वातावरण निर्मिती झाली आणि या निवडणुकीत सर्वात जास्त आठ जागा जिंकून काँग्रेसने मुसंडी मारली. देशात, राज्यात भाजपाचे सरकार असल्याने हे वातावरण भाजपा उमेदवारांसाठी अनुकूल होते. परंतु उमेदवारी देण्याच्या कारणावरून गटबाजीचे प्रदर्शन झाले. आ. संगीता ठोंबरे यांच्या गटाला एकही उमेदवारी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले रमेश आडसकर आणि हारूण इनामदार या दोघांच्या गटात जागांची विभागणी झाल्यामुळे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. ऐनवेळी जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अंतर्गत गटबाजी झाली.