लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मताधिक्य

By Admin | Updated: October 22, 2014 01:18 IST2014-10-22T00:59:06+5:302014-10-22T01:18:28+5:30

लातूर : ग्रामीण मतदारसंघ हा तसा रेणापुर मतदारसंघातील काही गावांचा समावेश असलेला गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ हा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लातूर ग्रामीणशी

Congress suffers vote in Latur rural | लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मताधिक्य

लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मताधिक्य


लातूर : ग्रामीण मतदारसंघ हा तसा रेणापुर मतदारसंघातील काही गावांचा समावेश असलेला गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ हा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लातूर ग्रामीणशी जोडला गेला़ परिणामी लोकनेते विलासराव देशमुख यांनी या मतदारसंघाचा चौफेर विकास केला, एकानंतर दुसराही आमदार त्र्यिंबकनाना भिसे यांच्या रूपाने दिली़ लातूर ग्रामीण मतदारसंघ बहुतांश काँग्रेसमय झाल्यामुळे भाजपा,राष्ट्रवादी,मनसे व शिवसेनेच्या प्रमाणात काँग्रेसच्या मताधिक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़
लातूर ग्रामीण मतदारसंघात मोरवड या गावात भाजपाला सर्व पक्षांच्या तुलनेत जास्तीचे मतदान मिळाले आहे़तर मोटेगाव, तांदुळजा, गाधवड,वाघोली या गावात काँग्रेसच्या उमेदवाराला चांगले माताधिक्य मिळाल्यामुळे हा पक्ष या भागात १ वर राहिला आहे़तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर ,तीसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, चौथ्या क्रमांकावर मनसे तर पाचव्या स्थानावर शिवसेना फेकली गेली आहे़तसेच गरसुळी या गावात भाजपाचा माजी तालुकाध्यक्ष असतांनाही भाजपाला कमी व काँगे्रसला पहिल्या क्रमांकाने मते मिळाली आहेत़पानगाव सर्कलमध्ये भाजपाला लीड मिळाली आहेक़ामखेडा गाव रेणा कारखान्याच्या चेअरमनचे गाव असतांनाही या गावात भाजपाला पहिल्या क्रमांकावर मते मिळाली आहेत़तर जिल्ह्यात क्रमांक एकवर असलेल्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत़बिटरगावात भाजपा या पक्षाला मानणारा वर्ग असल्यामुळे भाजपा उमेदवाराला ६४० मते मिळाली तर काँग्रेस उमेदवाराला ५१९ मते मिळाली आहेत़
लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवारांने पाच वर्षांपासून तयारी केली होती तरीही मुरूड, मुरूड बु़,रेणापूर, भादा,टाका, चिंचोलीराव वाडी या गावांत काँग्रेस उमेदवाराला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या पाच मोठ्या गावांमध्ये काँग्रेस उमेदवाराला चांगली लीड मिळलेली आहे़तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे़मनसेचे तालुक्यात म्हणावे तसे वातावरण नसतानाही मनसे तीसऱ्या स्थानावर आहे़
राष्ट्रवादी व सेना चौथ्या स्थानावर गेली आहे़त्यामुळे राष्ट्रवादी व मनसे व सेनेवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे़ (प्रतिनिधी)४
लातूर ग्रामीण मतदानसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्र्यंबकनाना भिसे यांना त्यांच्या भोकरंबा गावात ९१० मते मिळाली़ भाजपाला ३५९ मते तर राष्ट्रवादीच्या उमेदवार आशाताई भिसे यांना मात्र गावातच तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने त्या गावातच बॅकफुटवर फेकल्या गेल्या आहेत़ तर भाजपाचे उमेदवार रमेश कराड यांना लातूर तालुक्यातील रामेश्वर या त्यांच्या गावात ७७९ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला २८५ मते मिळाली आहेत़तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची ६ मते मिळाली आहेत़

Web Title: Congress suffers vote in Latur rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.