काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष
By Admin | Updated: December 28, 2015 23:51 IST2015-12-28T23:37:18+5:302015-12-28T23:51:29+5:30
सिल्लोड : विकासाची दृष्टी व सर्वसामान्यांना घेऊन चालणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सिल्लोड येथे केले

काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष
सिल्लोड : विकासाची दृष्टी व सर्वसामान्यांना घेऊन चालणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सिल्लोड येथे केले. काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सिल्लोडच्या गांधी भवन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री आ. सत्तार बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार होते. जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख (भोकरदन), राज्य फेडरेशन उपाध्यक्ष प्रभाकर आबा काळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या इतिहासावर प्रकाश टाकला. पक्षासाठी योगदान व बलिदान देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनकार्यास त्यांनी उजाळा दिला. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेसचे मोठे योगदान असून मुख्य भूमिका निभावली आहे. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य दीन-दलित, अल्पसंख्याक अशा १८ पगड जातींना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाला संपविण्याच्या कोणी कितीही वल्गना केल्या तरी वल्गना करणारे संपले; मात्र काँग्रेस पक्ष आजही एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे ताठ मानेने उभा आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनानिमत्त पक्षासाठी स्वत:ला वाहून घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काँग्रेस पक्षासाठी भरीव योगदान देणारे दादाभाई नौरोजी, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लोहपुरुष
सरदार वल्लभभाई पटेल, जय जवान-जय किसानचे प्रणेते लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद या महापुरुषांच्या प्रतिमेस श्रीराम महाजन व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.