काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आढावा पूर्ण

By Admin | Updated: July 21, 2014 00:37 IST2014-07-21T00:34:49+5:302014-07-21T00:37:37+5:30

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला़ या आढाव्यात पक्षाचे पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यात आली

The Congress party has completed the district-wise review of the constituency | काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आढावा पूर्ण

काँग्रेस पक्षाकडून जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आढावा पूर्ण

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला़ या आढाव्यात पक्षाचे पदाधिकारी यांची मते जाणून घेण्यात आली तसेच इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रियाही पार पाडली़
काँग्रेसचे केंद्रीय पक्षनिरीक्षक तथा आंध्र प्रदेशातील आ़ बी़ चेंगल रायडू यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे समन्वयक विलासराव औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला़ पूर्णा रस्त्यावरील पावडे मंगल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आज रविवारी दुसऱ्या दिवशी नायगाव, कंधार, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली़ त्यात कंधार मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी कंधार तालुका काँग्रेस कमिटीने केंद्रीय निरीक्षकांकडे केली़ दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवारास मदत केली़ निवडूनही आणले़ मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसची पिछेहाट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे़ कंधार व लोहा तालुक्यातील ६० टक्के ग्रा़पं़ वर काँग्रेसचे वर्चस्व आहे़ कंधार पंचायत समिती काँग्रेसकडे, ऩप़तही काँग्रेसचेच सदस्य जास्त, जि़प़ सदस्यांचीही संख्या जास्त अशी परिस्थिती असल्याची बाब पक्षनिरीक्षकांपुढे तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, सरचिटणीस संजय भोसीकर, लोहा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी डॉ़ श्याम तेलंग यांनी मांडली़
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आ़ ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व माधवराव पाटील झरीकर हे इच्छुक आहेत़ कंदकुर्ते यांनी २५ वर्षांपासून पक्षाचे काम करत असून संधी मिळावी अशी भूमिका मांडली़
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मात्र पालकमंत्री डी़पी़ सावंत यांनीच निवडणूक लढविण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली़ अन्य कुणीही इच्छुक या मतदारसंघातून पुढे आला नाही़ अशीच परिस्थिती नायगाव मतदारसंघातही राहिली़ यावेळी पालकमंत्री सावंत, आ़ अमरनाथ राजूरकर, आ़ पोकर्णा, आ़ चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: The Congress party has completed the district-wise review of the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.