काँग्रेसतर्फे ‘व्यर्थ न हो बलिदान’सह विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:03 IST2021-08-15T04:03:56+5:302021-08-15T04:03:56+5:30

औरंगाबाद : प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १६ ऑगस्ट रोजी ‘व्यर्थ न हो बलिदान’सह ...

Congress organizes various programs including 'Vayan Na Ho Balidan' | काँग्रेसतर्फे ‘व्यर्थ न हो बलिदान’सह विविध कार्यक्रमांचे आयोजन

काँग्रेसतर्फे ‘व्यर्थ न हो बलिदान’सह विविध कार्यक्रमांचे आयोजन

औरंगाबाद : प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १६ ऑगस्ट रोजी ‘व्यर्थ न हो बलिदान’सह चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी येथे पत्रपरिषदेत प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व निरीक्षक संजय राठोड यांनी दिली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख या मंत्र्यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सकाळी ९ वाजेपासून रॅलीव्दारे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज़ोतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०:३० वा. तापडिया नाट्यमंदिरात ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमात शहर व जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येईल. दुपारी २ ते ३ या वेळेत गांधी भवन, शहागंज येथे नाना पटोले हे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या कॉंग्रेसचा आढावा घेतील. दुपारी ३:३० वा. सागर लॉन येथे जिल्हा व शहर कॉंग्रेसच्या मेळाव्यास मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी ५:३० वा. तापडिया नाट्य मंदिरात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या मेळाव्यास मार्गदर्शन करतील.

जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्य‌क्ष हिशाम उस्मानी, अशोक सायन्ना, शेख युसूफ, रवी काळे, प्रल्हाद राठ़ोड, सय्यद अक्रम, भाऊसाहेब जगताप, डॉ. पवन डोंगरे, डॉ. अरुण शिरसाट, महेंद्र रमंडवाल, सचिन शिरसाठ, इब्राहिम पठाण, जयप्रकाश नारनवरे, आतिष पितळे आदींची आजच्या पत्रपरिषदेस उपस्थिती होती.

Web Title: Congress organizes various programs including 'Vayan Na Ho Balidan'