काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर
By Admin | Updated: September 11, 2014 00:01 IST2014-09-10T23:59:23+5:302014-09-11T00:01:41+5:30
हिंगोली : पंचायत समिती सभापतीपदासाठी पात्र उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडेच असून दोन्हीकडून या पदासाठी हालचाली सुरू आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर
हिंगोली : पंचायत समिती सभापतीपदासाठी पात्र उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडेच असून दोन्हीकडून या पदासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी व बसपा सदस्य सहलीवर गेल्याने पुन्हा जुनेच समीकरण जुळण्याची शक्यता बळावली आहे.
हिंगोली पंचायत समितीत मागील वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने बसपाच्या सदस्याला सोबत घेऊन बाजी मारली होती. त्यात छगन बनसोडे हे सभापतीपदी विराजमान झाले. तर बसपाच्या विनोद नायक यांना उपसभापतीपद मिळाले होते. सभागृतील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर कॉंग्रेस-५, राष्ट्रवादी कॉंग्रेस-३, शिवसेना-४, भाजपा-३ व बसपा १ असे संख्याबळ आहे.
मागीलवेळी बसपाशी नाते जोडले तरी युतीच्या उमेदवारांना स्पष्ट बहुमत मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय अवलंबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बसपाने सुरक्षित डाव खेळत उपसभापतीपदाची बक्षिसी मिळवत कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी घरोबा केला होता.
यावेळी राष्ट्रवादीकडेच सभापतीपदाचे उमेदवार आहेत. यात लताबाई जाधव व सीताबाई राठोड यांचा समावेश आहे. त्यामुळे सभापतीपद राकॉंकडेच जाणार, हे तेवढे निश्चित मानले जाते. उपसभापतीपदी कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. त्यात दुल्लेखॉं यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर बसपाचे नायक यांना मागीलवेळी पद मिळाल्यामुळे ते यावेळी केवळ बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जाते. अधिकृतरीत्या हे कोणीही बोलायला तयार नाही. मात्र हे सदस्य सहलीवर गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)