शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात प्रचाराकडे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 'स्टार' नेत्यांचे दुर्लक्ष; हर्षवर्धन सपकाळांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:47 IST

राज्यातील सत्तारूढ पक्षातील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर : नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मराठवाड्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी सभा आणि बैठकांचा धुरळा उडवला असताना काँग्रेस पक्षात मात्र थंड वातावरण दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता अन्य एकही बडा नेता मराठवाड्यात सभांसाठी आलेला नाही.

राज्यातील सत्तारूढ पक्षातील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अप) यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपने तर मराठवाड्यातील प्रत्येक नगर परिषद आणि नगरपंचायत पिंजून काढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेते प्रचारात गुंतले आहेत. शिंदेसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठवाड्यात सभा घेतल्या. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठवाड्यात प्रचाराचा आणि वादग्रस्त विधानांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रचार पिछाडीवर पडला आहे.

काँग्रेस पक्षाने राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी सुमारे ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. मात्र, ही यादी कागदावरच राहिल्याचे दिसते. राज्यात काँग्रेस पक्षातील नेते मात्र प्रचाराच्या बाबतीत फारसे सक्रिय नाहीत, असे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड, आरेफ नसीम खान ही मंडळी मराठवाड्यात पक्षाच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आलेली नाहीत. पक्षाचे स्टार प्रचारक असलेले लातूरचे आमदार अमित देशमुख यांनीही लातूर सोडून इतरत्र लक्ष घातलेले नाही. नाही म्हणायला त्यांनी लातूरला एक पत्रकार परिषद घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांसाठी धावताना दिसत आहेत.

सपकाळ यांच्या मराठवाड्यातील सभा:हिंगोली : वसमतनांदेड : किनवट, भोकर, हिमायतनगर, देगलूरजालना : भोकरदनबीड : बीड शहर, परळी

राष्ट्रवादी (श.प.) ची हीच अवस्थाराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची देखील अशीच अवस्था आहे. या पक्षाचे ना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे फिरकले ना जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या सारखे बडे नेते.नांदेडमध्ये आ. प्रताप पाटील चिखलीकर, तर बीडमध्ये आ. संदीप क्षीरसागर पक्षाची बाजू सांभाळत आहेत.

१८ टक्के पालिकांकडे दुर्लक्ष२ डिसेंबर रोजी मतदान होणाऱ्या राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींपैकी मराठवाड्यात ५२ नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण पालिकांपैकी मराठवाड्यातील १८ टक्के नगर परिषदा आणि नगरपंचायतींत निवडणूक होत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या नगर परिषदांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा प्रचार संपायला केवळ चार दिवस बाकी राहिले असताना सपकाळ वगळता धाराशिव, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याची अद्याप एकही सभा झालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress, NCP 'Star' Leaders Neglect Marathwada; Only Sapkal Campaigns

Web Summary : Congress and NCP's big leaders ignore Marathwada local polls, leaving the field open for BJP and Shinde Sena. Only Harshvardhan Sapkal is actively campaigning.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकcongressकाँग्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर