केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By Admin | Updated: May 27, 2015 00:38 IST2015-05-27T00:22:34+5:302015-05-27T00:38:36+5:30

जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले.

Congress movement against central government | केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन


जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले.
याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बी.एल. गिरी यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करणार, जीवनावश्यक वस्तूंची महागाई रोखणार इत्यादी आश्वासने देण्यात आली. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. अच्छे दिन येणार म्हणून लोकांना भुलविणारी खोटी आश्वासने भाजपा नेत्यांनी दिली. याउलट जनहितविरोधी निर्णय घेण्यास सरकारने सुरूवात केला, असा आरोप करून काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली गांधीचमन येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, सेवादल अध्यक्ष प्रशांत वाढेकर, बाबूराव कुलकर्णी, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, विष्णू कंटुले, सुरेश तळेकर, इकबाल कुरैशी, सदाशिव गाडे, श्रीकिशन जेठे, राम सावंत, ज्ञानेश्वर डुकरे, मंजितराव टकले, सोनाबाई निकाळजे, अशोक उबाळे, शीतल तनपुरे, नगरसेवक अरूण मगरे, संजय भगत, रवि अकोलकर, महेंद्र अकोलकर, राहुल हिवराळे, रमेश गौरक्षक, विष्णू वाघमारे, शेख माजेद, चंद्रकांत पगारे, जाकेर डावरगावकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संजय खडके, शेख मोबीन यांची उपस्थिती होती.
आंदोलनप्रसंगी बोलताना माजी आमदार गोरंट्याल म्हणाले की, जनहित विरोधी असणाऱ्या व खोटी स्वप्ने दाखवून मते मागणाऱ्या भाजपा सरकारचे खरे रूप लोकांसमोर आले आहे.
हे सरकार मोठे उद्योगपती, भांडवलदार व बिल्डर यांच्या फायद्यासाठी काम करत असून शेतकरी व गोरगरीब जनता यांचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी गोरगरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी विनोद यादव, शेख ईसा, रमाकांत मद्दलवार, अरूण सरदार, शेख अफरोज, मोसीन पठाण, ज्ञानेश्वर उगले, अंजेभाऊ चव्हाण, माणिक राठोड, लता डोंगरे, कादर मोमीन, एस.एन. देशमुख, शेख नसीर, राज स्वामी, राजू वीर, देवीलाल डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congress movement against central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.