औशात काँग्रेसचे कदम सभापती, मनसेच्या नागराळे उपसभापती

By Admin | Updated: March 14, 2017 23:52 IST2017-03-14T23:49:53+5:302017-03-14T23:52:37+5:30

औसा : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संजय कदम तर उपसभापती मनसेच्या रेखाताई नागराळे यांचा विजय झाला

Congress leader in Oausa, Chairperson of MNS, Nagaray sub-party | औशात काँग्रेसचे कदम सभापती, मनसेच्या नागराळे उपसभापती

औशात काँग्रेसचे कदम सभापती, मनसेच्या नागराळे उपसभापती

औसा : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संजय कदम तर उपसभापती मनसेच्या रेखाताई नागराळे यांचा विजय झाला आहे़ काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता असल्याने मनसेला सोबत घेण्यात आले़ तसेच राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनीही काँग्रेसला मतदान केले़
पंचायत समिती सभागृहात तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सभापतीपदासाठी दोन तर उपसभापती पदासाठी तिघांनी अर्ज दाखल केले होते. बैठक सुरु झाल्यावर शिवसेनेच्या सदिच्छा माने यांनी उपसभापती पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला. कॉंग्रेसचे उमेदवार संजय कदम यांना बारा तर भाजपाचे उमेदवार जनार्धन कास्ते यांना सहा मते मिळाली. उपसभापती पदासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या रेखाताई नागराळे यांना बारा मते मिळाली. तर भाजपाचे उमेदवार दीपक चाबुकस्वार यांना सहा मते मिळाली़ काँग्रेसचे ९, भाजपाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ व मनसे व शिवसेनेचा एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे़ सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर काँग्रेस व मनसे कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
(आणखी वृत्त हॅलो / २ वर)

Web Title: Congress leader in Oausa, Chairperson of MNS, Nagaray sub-party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.