काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

By Admin | Updated: March 2, 2016 23:19 IST2016-03-02T23:15:06+5:302016-03-02T23:19:02+5:30

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बद्दल अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व सरपंच संघटनेच्या वतीने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

Congress Jode Maro Movement | काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन


लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या बद्दल अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व सरपंच संघटनेच्या वतीने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन बुधवारी शिवाजी चौक येथे करण्यात आले़
लातूरच्या पाणी प्रश्नासंदर्भात राज्यमंत्री शिवतारे यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे़
बुधवारी ग्रामीण सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव गंभीरे व ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमर मोरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिवाजी चौकात शिवतारे यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली़ त्यानंतर राज्यमंत्री शिवतारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मारो आंदोलन करण्यात आले़
यावेळी संजय पाटील, रसुल पटेल, उमेश बेंद्रे, भालचंद्र पाटील, महेंद्र मुळे, बाळकृ ष्ण माने, आनिल पाटील, तुकाराम घोडसे, निलेश कांबळे, शिवराज गांधले, दिपक पटाडे, ज्ञानेश्वर पवार, श्रीकृष्ण काळे, गुलाब चव्हाण, प्रविण पाटील, अमर पाटील, रामानुज जाधव, गोविंद कदम, प्रशांत माने, निखिलेश पाटील, धनंजय माने, मंचक राऊतराव, गणेश ढगे, अमोल भिसे, अनिल पवार, गजानन पाटील, माऊली पवार, संतोष माने, बालाजी वाघमारे, रामभाऊ गोरे, भरत नरवडे, रामेश्वर स्वामी, विजय चौंडे, कमलाकर अनंतवाड, समाधान गायकवाड, प्रभू राठोड, मानोज पाटील आदी कार्यकर्त्याचा सहभाग झाले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Congress Jode Maro Movement