काँग्रेसचा जनाधार संपला-आंबेडकर

By Admin | Updated: September 5, 2014 00:15 IST2014-09-04T23:43:40+5:302014-09-05T00:15:11+5:30

परभणी : काँग्रेसच्या पक्षाचा जनाधार संपला असल्याची टिका महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली़

Congress' Janadar Khandala-Ambedkar | काँग्रेसचा जनाधार संपला-आंबेडकर

काँग्रेसचा जनाधार संपला-आंबेडकर

परभणी : राज्यातील काँग्रेसच्या सत्ताधारी टोळीने सर्वसामान्यांना संपविण्याचे कार्य केले आहे़ त्यामुळे आता पक्षाचा जनाधार संपला असल्याची टिका महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली़
भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर ३ सप्टेंबर रोजी जाहीर कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड़ बाळासाहेब आंबेडकर बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुज्तबा फारुख, लोकभारतीचे अध्यक्ष आ़ कपील पाटील, लाल निशान पक्षाचे अध्यक्ष कॉ़ भीमराव बनसोडे, शब्बीर अन्सारी, प्रा़ अविनाश डोळस, गौतम लांडगे, चोखाजी नाना सौंदर्य, सुधाकर निकाळजे, कॉ़ उद्धव शिंदे, यशवंत भालेराव, धम्मपाल सोनटक्के, दिलीप हनुमंते, उत्तमराव खंदारे, प्रा़ प्रदीप कनकुटे आदींची उपस्थिती होती़
अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले की, राज्यातील वायदे बाजार संपविल्याशिवाय महागाई कमी होणार नाही़ त्यासाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिल्यास वायदे बाजार संपुष्ठात आणण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले़ यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन भारिप बहुजन महासंघाचे महासचिव गौतम लांडगे तर वेलफेअर पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सय्यद अ़ रहीम यांनी आभार मानले़ (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress' Janadar Khandala-Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.