अंबडला पाण्यासाठी काँग्रेसने काढला मोर्चा
By Admin | Updated: November 4, 2014 01:36 IST2014-11-04T00:29:36+5:302014-11-04T01:36:51+5:30
अंबड : शहरास विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

अंबडला पाण्यासाठी काँग्रेसने काढला मोर्चा
अंबड : शहरास विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करणे तसेच स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
शहरात मागील दोन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. पंधरा दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठाही अत्यंत दूषित असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचारांसाठी हजारों रुपयांचा नाहक भुर्दंड भोगावा लागत आहे.
यावर नगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीही वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मोर्चामध्ये नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते केदार कुलकर्णी, न.प.सदस्य जाकेर डावरगांवकर, प्रकाश नारायणकर, खुर्शिद जिलाणी, जगन खरात, नारायण कटारे, सोमनाथ उदावंत यांच्यासह रवि डोंगरे, संभाजी गुडे, युनुस तांबोळी, राजेंद्र मोरे, दामोधर गायकवाड, अशोक खरात, शेख युनुस, जुनेद डावरगांवकर, मुरलीधर नारायणकर, शेख हाफीज, गाजी, शेख असलम, धर्मराज बाबर, बाबाराजा शिंदे, मुस्तीकीन तांबोळी, प्रविण दुधाधारी, मुकिम पठाण, शेख जावेद, अब्दुल समद, शेख मजहर, शेख खादिर, शेख सलीम आदींसह मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कँडल मार्चचे आयोजन योगेश मेखले व गणेश खरात यांनी केले होते. (वार्ताहर)